Monday, April 29, 2024
Homeनगररस्त्यांच्या गुणवत्तेवरून मनपा टांगली वेशीला

रस्त्यांच्या गुणवत्तेवरून मनपा टांगली वेशीला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील रस्ते विकासाचे पाणी भलतीकडे मुरते, याची आता नगरकरांना सवय झालेली आहे. या रस्तांची गुणवत्ता सुमार दर्जाची असते, याबाबतही जनतेच्या मनात दुमत नाही. रस्त्यांची गुणवत्ता तपासणी वारंवार टाळली जात असल्याने अखेर मनसेचे नितीन भुतारे यांनी थेट चाचणीसाठी येणार्‍या खर्चापोटी 25 हजारांना डिमांड ड्राफ्ट महापालिकेला पाठवून दिला आहे. चाचणी झाली तर भ्रष्टाचार्‍यांचे चेहरे उघडे पडतील, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने महापालिकेच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

अहमदनगर शहारातील पाइपलाइन रोड, तारकपुर ते गंगा उद्यान, तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौक हे रस्ते नव्याने झाले. त्यातील काही रस्ते खराबही झाले आहेत. त्यामुळे भुतारे यांनी नाशिक गुणवत्ता चाचणी सार्वजनिक बांधकाम विभाकडून गुणवत्ता चाचण कारण्याची मागणी केली होती. त्यासाठी लागणारा खर्च स्वत: करणार असे पत्र त्यांनी महानगपालिका आयुक्तांना 9 जून 2022 रोजी आयुक्तांना पाठविले.

महानगरपालिकेने पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक गुणवत्ता विभागास पत्रव्यवहार करुन तशी मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी महापालिकेचच्या शहर अभियंत्यांना गुणवत्ता चाचणीस उपस्थीत रहावे, असे कळवले. आता 4 ते पाच महिने उलटून गेले तरी महापालिकेकडून तपासणीत खोडा घातला जात आहे.

या अधिकार्‍यांच्या नित्कृष्ट कामांचे भांडे जनतेसमोर फुटेल म्हणून गुणवत्ता चाचणीला महापालिका अधिकारी हजर राहत नाहीत, असा आरोप भुतारे यांनी केला आहे. एखर त्यांनी रजिस्टर पोस्टाने महापालिका आयुक्तांना या रस्त्यांची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी 25 हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठविला आहे. हे रस्ते खराबच आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे चाचणी करून या भ्रष्ट कारभारावर कारवाईचे धाडस महापालिका दाखवणार का, याची जनतेला उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या