Friday, April 26, 2024
Homeधुळेदळणवळणाच्या दृष्टीने रस्ते व पुलांची कामे महत्वाची

दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते व पुलांची कामे महत्वाची

धुळे Dhule । प्रतिनिधी

रस्ते (Roads) आणि पुलांची (bridges) कामे दळणवळणाच्या (transportation) दृष्टीने महत्वाचे असून वरखेडी-कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर (Panjra river) होणार्‍या पुलामुळे वरखेडे आणि परिसारातील 15 गावांचा (villages) विकासाला गती (Accelerate development) मिळणार आहे असे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी केले.

- Advertisement -

आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वरेखडी-कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर (Panjra river) मोठ्या पुलाचे (bridges) बांधकाम मंजुर करण्यात आले आहे. या कामाचे आ.पाटील यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले.

धुळे ग्रामीण मतदारसंघातील वरखेडे-कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून आ.कुणाल पाटील यांनी विशेष प्रयत्न करुन पुलासाठी निधी मंजुर (Funding approved) करुन केला होता. या कामाचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. जोड रस्त्यासह पुलाच्या बांधकामासाठी एकूण आठ कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

माजी महापौर चंद्रकात सोनार म्हणाले की, दळणवळणाच्या सुविधांशिवाय प्रगती (Progress) शक्य नसते. या पुलाच्या कामामुळे वरखेडे गावाची सुविधा आणि शोभा वाढणार आहे. वरखेडे परिसरासह तालुक्याच्या विकासात आ.कुणाल पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आ.कुणाल पाटील म्हणाले की, वरखेडी येथे पांझरा नदीवर पुलाचे बांधकाम करण्याचे निवडणकीत दिलेले आश्वासन पुर्ण केले आहे. धुळे महापालिकेत (Dhule Municipal Corporation) वरखेडी गावाचा समावेश झाला आहे. गावाचा माजी महापौर चंद्रकात सोनार यांनी उत्कृष्ठ आणि नियोजनबध्द विकास केला आहे.त्यांनी अनेक विकासाची कामे या गावात केलेली आहेत. रस्ते आणि पुल हे विकासाचे महत्वाचे मार्ग असतात त्यातून दळण वळणाची सुविधा निर्माण होवून त्या भागाच्या विकासाला(development) गती मिळत असते. या पुलामुळे वरखेडी परिसरातील 15 पेक्षा अधिक गावांच्या प्रगतीचा चालना मिळणार असल्याचे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले.

पांझरा-बोरीवर पुल-धुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळावी आणि नागरीक, शेतकरी, वाहनधारकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून पांझरा नदी आणि बोरी नदीवर (Bori river) पुलांचे बांधकामांना प्राधान्य दिले असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

पांझरा नदीवर कुंडाणे-वार, मोराणे प्र.नेर येथे पुलांचे बांधकाम झालेले पुल आणि वरखेडीजवळ आज भुमीपुजन झालेला पुल तसेच बोरी नदीवर शिरुडजवळ पुर्ण झालेला पुल, निमगुळ गावाजवळ प्रगतीपथावरील पुल, धाडरे गावाजवळ मंजुर झालेला पुल (bridges) असे एकूण सहा पुलांची निर्मीती होणार आहे. त्यापैकी काही पुलांचे काम पूर्ण झाले आहे.असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.

वरेखडी येथील भूमीपुजन कार्यक्रमात आ.कुणाल पाटील यांच्यासोबत माजी महापौर चंद्रकात सोनार, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, उपविभागीय अभियंता डी.पी.इसे, शाखा अभियंता कैलास वाडेकर, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के.डी.पाटील, माजी पं.स. सदस्य ज्ञानेश्वर मराठे, रावसाहेब पाटील, छोटू चौधरी, सोमनाथ पाटील, अरुण पाटील, सागर पाटील, बापू खैरनार, शिवाजी अहिरे, संतोष पाटील, दिनकर पाटील,विलास धनगर, पं.स. सदस्या सुरेखा बडगुजर, नगरसेवक संजय अहिरे, विलास चौधरी, संदिप पाटील, प्रकाश कोळी, सुरेश पाटील, विलास गुजर, कैलास मराठे, गुलाबराव मराठे, हिरामण पाटील,सुधाकर पाटील, देवराम माळी, विलास पटेल,वसंत पाटील, नवल धनगर, भावराव भिल, ईश्वरलाल मराठे, शांताराम चौधरी, विजय चौधरी, दौलत चौधरी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या