Saturday, April 27, 2024
Homeनाशिकवेळ पडल्यास रस्ताकाम स्वखर्चाने : जगताप

वेळ पडल्यास रस्ताकाम स्वखर्चाने : जगताप

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

ग्रामीण भागातील (rural area) रस्ते (road) तसेच मुलभूत सुविधांना प्राधान्य देऊन काम पूर्णत्वास जाण्यासाठी आपण प्रयत्नशील असून गटातील उर्वरित रस्त्यांची कामे (Road works) वेळ पडल्यास स्वखर्चाने पूर्ण करण्यासाठी बांधील आहे.

- Advertisement -

करोना (corona) काळात देखील जनतेची केलेली सेवा ही कोणत्याही राजकीय हेतू पोटी न करता सामाजिक बांधिलकी जपत केली आहे व भविष्यातही अशीच सेवा करतच राहू. पाणी प्रश्नाबरोबरच रस्त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन जि.प. सदस्य डी.के. जगताप (Z.P. Member D.K. Jagtap) यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) निधी (fund) मधून विविध विकासकामांच्या शुभारंभाप्रसंंगी डी.के. जगताप बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून नामको बँक (namco bank) व्हा. चेअरमन प्रकाश दायमा (Prakash Dayama), लासलगाव बाजार समिती (Lasalgaon Market Committee) सभापति सुवर्णा जगताप (Chairman Suvarna Jagtap), कोटमगाव सरपंच तुकाराम गांगुर्डे आदी उपस्थित होते. यावेळी जि.प. सेस अंतर्गत 45 लाख रुपये खर्चाच्या कोटमगाव,

टाकळी (विंचूर)-पिंपळद तसेच कोटमगाव-थेटाळे रस्त्यासाठी 20 लाख रुपये, कोटमगाव विठ्ठलवाडी रस्ता दुरूस्ती 20 लाख रुपये, थेटाळे येथे पाईप मोरी 2 लाख रुपये अशा एकूण 69 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जगताप यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कोटमगाव उपसरपंच भाऊसाहेब पवार, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब केशव पवार, दत्तात्रय पवार, नांदु सुपेकर, दत्ता पाटील, अमोल थोरे, टाकळी ग्रा.पं. सदस्य केशव जाधव, हरीश गवळी, सोमनाथ गांगुर्डे, बाबाजी मोरे, मुकुंद काळे, तुकाराम भिलोरे,

कैलास शिरसाठ, दामोदर शिरसाठ, सोमनाथ मोरे, राजेंद्र केंदळे, बळीराम जाधव, संतोष गोरडे, संजय मोरे, नंदू मोरे, अमोल मोरे, सचिन गोसावी, कारभारी भिलोरे, दत्तात्रय भिलोरे, सादिक मुलानी, बुरगुडे, रामदास गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, रंजना शिंदे, चंद्रकला गांगुर्डे, लक्ष्मीबाई डोखे, सोनाली माने आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या