Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपरनॉर्ड कंपनी ते वागदेव फाटा रस्त्याच्या कामाला सुरुवात

परनॉर्ड कंपनी ते वागदेव फाटा रस्त्याच्या कामाला सुरुवात

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील परनॉर्ड रिकार्ड इंडिया या कंपनी कडून वागदेव फाटा ते परनॉर्ड रिकार्ड कंपनी या तीन किमी अंतराच्या दुरुस्तीचे काम कपनीने नुकतेच चालू केले आहे. या रस्त्याची चाळण झाल्यामुळे जीव मुठीत धरून वाहनधारकांना जावे लागत होते. या रस्त्याला मुहूर्त लागल्यामुळे कंपनी प्रशासनासह कादवा माळूगी , म्हैळूस्के, ओझे, करंजवण येथील वाहनचालकासह परिसरातील वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे…

- Advertisement -

वागदेव फाटा ते परनॉर्ड रिकार्ड कपनी. कादवा माळूगी,म्हैळूस्के , ओझे, करजवण या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्याचप्रमाणे शेतक-यांच्या भाजीपाला वाहतुकही यांच रस्त्याने होत असते.

करंजवण पासून दिंडोरीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. मात्र, म्हैळूस्के फाटा ते कादवा म्हाळुंगी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब असल्यामुळे सध्या या रस्त्याने जरा वाहतुक कमी झालेली होती.

या ७ ते ८ किमी अंतराचा रस्ता नविन केल्यास खेडले, पिंपरखेडसह पश्चिम पश्चिम भागांमध्ये जाण्यासाठी हा खूप जवळचा मार्ग आहे. यासाठी हा रस्ता होण्याची आवश्यकता होती.

दिंडोरी तालुक्यातील परनॉर्ड रिकॉर्ड कंपनीही एकमेव कंपनी अशी आहे की, कायम या तीन किमी अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती करत असते. त्याप्रमाणे मोठे-मोठे विकासकामे या कंपनीने तालुक्यात केले आहेत.

शासनाला सर्वात जास्त महसूल देणारी तालुक्यातील ही एकमेव कंपनी आहे. परनॉर्ड रिकॉर्ड कंपनीने करत असलेल्या रस्ता दुरूस्तीने या परिसरातील जनतेने आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या