Thursday, April 25, 2024
Homeनगरसंथगतीने काम करणार्‍या ठेकेदाराची मार्चनंतर उचलबांगडी

संथगतीने काम करणार्‍या ठेकेदाराची मार्चनंतर उचलबांगडी

करंजी (वार्ताहर) –

कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामासह पुर्वीच्या ठेकेदाराने केलेल्या

- Advertisement -

कामाबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून संथगतिने काम करणार्‍या ठेकेदाराची मार्चनंतर उचलबांगडी करणार असून हे काम मी माझ्या पद्धतीने आता पूर्ण करून घेणार आहे, असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या भागातील प्रवाशांना दिला आहे.

नगर-पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण, निर्मळ, विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने आणि निकृष्ट पद्धतीने सुरू असून काम इस्टिमेटप्रमाणे होत नसून करंजी तिसगाव येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्यास देखील गेल्या वर्षभरापासून या ठेकेदाराला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे या दोन्ही गावचे व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून मध्यंतरी पूर्वीच्या ठेकेदाराकडून काम व्यवस्थित व चांगल्या दर्जाचेे होत नसल्या कारणाने पुर्वीच्या ठेकेदाराचे काम रद्द करून नवीन ठेकेदार नेमण्यात आला. त्यानंतर या महामार्गाचे काम उरकते घेण्याचे काम या ठेकेदाराने केले. अनेक ठिकाणचे धोकादायक वळण दुरूस्त न करता ‘जैसे थेच’ ठेवण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू असून महामार्गाचे काम करत असताना करंजी येथे होणार्‍या महामार्गाच्या रस्त्यावर ‘एस’ आकाराचे वळण तयार होत असून याबाबत वरिष्ठांनी प्रत्यक्ष पाहणी करावी.

तसेच महादेव मंदिराजवळील धोदायक वळण देखील ‘जैसे थे’ ठेवण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यामुळे या धोकादायक वळणामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊ शकतात व त्याचा धोका उत्तरेश्वर मंदिर येथे येणार्‍या भाविकांसाठी व ग्रामस्थांसाठी होऊ शकतो. तसेच मराठवाडी बारव या ठिकाणी पावसाळ्यात महामार्गावर मोठ्या पाणी साचते तेथे दुरुस्ती होणे महत्त्वाचे आहे. तसेच जाबकौडगाव येथील दोन धोकादायक वळणाबाबत ठेकेदार व संबंधित अधिकारी अधिकृत माहिती देत नसल्याने कवडगाव येथे महामार्गाच्या रस्त्याबाबत संभ्रम आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण न करताच थेट डांबरीकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

नव्याने करण्यात आलेले पुलही अरुंद आहे त्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तसेच ठेवून ठराविक ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व त्यापासून उडणार्‍या धुळीमुळे महामार्गालगत असणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महामार्गाचे काम उरकते घेण्याच्या प्रयत्नात ते इस्टिमेटप्रमाणे होताना दिसत नाही. याची गंभीर दखल खा. विखे पा. यांनी घेतली आहे. या महामार्गाबाबत आठ दिवसापुर्वी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले होते.

नगर-पाथर्डी मार्गे जात असलेल्या महामार्गाचे काम वेळेत व चांगल्या पद्धतीचे व्हावे. यासाठी लागेल तेवढा निधी देण्यास मी तयार आहे, अशा शब्दात ठेकेदाराला मी सांगितले. तरीदेखील या कामास गती मिळत नसल्याने आता या महामार्गाचे काम मी माझ्या पद्धतीने पूर्ण करणार आहे, असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या भागातील कार्यकर्त्यांना दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या