Monday, April 29, 2024
Homeजळगावस्व.आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या राजकारणात सक्रिय!

स्व.आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या राजकारणात सक्रिय!

पाचोरा Pachora प्रतिनिधी

शिवसेना युवा प्रमुख (Shiv Sena youth chief) यांच्या जळगाव जिल्हा शिव संवाद दौऱ्याची (Shiv Samvad Tours) पाचोरा नगरीतून सुरुवात (beginning) करण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील (Former MLA Late Tatyasaheb R. O. Patil) यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दौऱ्या पासून मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय (Active in politics) झालेल्या आर ओ त्यात्या पाटील यांच्या कन्या वैशालीताई पाटील (Daughter Vaishalitai Patil) यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेना तालुकाप्रमुख, रमेश बाफना, उपजिल्हा प्रमुख ऍड अभय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, उध्दव मराठे, नरेंद्रसिंग सुर्यवंशी,भडगाव तालुका प्रमुख लखीचंद पाटील, दत्ता जडे, भरत खंडेलवाल, अरुण तांबे, नाना वाघ, सह शिवसैनिक उपस्थित होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दि.९ ऑगस्ट मंगळवार रोजी जळगांव जिल्ह्याच्या शिव संवाद दौऱ्याची सुरुवात पाचोरा येथून सुरुवात होणार आहे.

श्री. ठाकरे जळगांव येथून पाचोरा शहराकडे येतांना त्यांचे सामनेर व जागोजागी शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. जारगाव चौफुली मार्गे ते भडगावरोड वरील महाराणा प्रताप चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौकातून, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून शिवसेनेचे मध्यवर्ती शिवतीर्थ कार्यालया समोरील रस्त्यावर जनतेशी संवाद साधणार आहेत .

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेना मुंबई सरचिटणीस अमोल किर्तिकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे,विभागीय सचिव विराज कावडिया, जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, हर्षल माने, विष्णू भंगाळे, दिपक राजपूत, समाधान महाजन, महिला आघाडीच्या पदाधिकारी महानंदा पाटील, जळगांव महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे आदींचा समावेश असणार आहे.

पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद दौऱ्यापासून मतदार संघाच्या आणि राज्याच्या शिवसेनेच्या दोन गटांच्या राजकीय धुराळ्यात मूळ शिवसेनेचे दावेदार सेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवधनुष्य हातात आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला भगवा खांद्यावर घेऊन पाचोरा – भडगाव मतदार संघात राजकीय परंपरा तोडून दोन वेळा आमदार झालेले स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या सुकन्या वैशालीताई पाटील ह्या राजकीय रणसंग्रामात तयारीनिशी उतरणार आहेत.

प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना वैशालीताई पाटील म्हणाल्या कि, सद्या जे काही राजकीय वातावरण आहे ते अगदी विचित्र आहे. आमची तत्वाची लढाई असणार आहे. आणि पुढील काळात राजकिय वाटचाल ही वेळ ठरवेल पुढील राजकीय प्रवासा बाबत त्यांनी सूचक प्रश्नचिन्ह निर्माण करणारे संकेत दिले.

वैशालीताई पाटील यांच्या सक्रिय राजकारणामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत राजकीय संघर्ष पहायला मिळेल अश्या खुमासदार चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत. तर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील म्हणाले कि, आगामी काळातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका शिवसेना संपूर्ण ताकदीने शिवसेना लढणार आहे. तसेच जे निष्ठावंत शिवसैनिक कायम शिवसेने सोबत आहेत त्या पदाधिकाऱ्यांची पदे कायम राहतील आणि जे सोडून गेले त्यांची पदांवरून हकालपट्टी करण्याचे संकेत दिले.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्याचे नेतृत्व वैशालीताई पाटील ह्या करणार असून यावेळी काही जणांचे प्रवेश होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या नंतर लवकरच सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पाचोरा मतदारसंघात येणार असून त्यांच्या हातून स्व.तात्यासाहेब आर.ओ.तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि मतदारसंघात विविध राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या