Friday, April 26, 2024
Homeक्रीडारिव्हर साईड गोल्फ कोर्से चषक 12 पासून

रिव्हर साईड गोल्फ कोर्से चषक 12 पासून

नाशिक | Nashik

रिव्हर साईड गोल्फ कोर्से ,गोल्फ असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 आणि 13 डिसेम्बर, 2020 दरम्यान या दुसर्‍या खुल्या गटाच्या रिव्हर साईड गोल्फ कोर्से चषक स्पर्धा होत आहेत.

- Advertisement -

12 डिसेम्बर रोजी एअर कमोडर श्यामसुंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे औपचारिक उदघाटन होणार आहे. रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे 9 (नऊ ) होलची सुविधा आहे.

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांना या 9 होलचे दोन राऊंड्स पार करावे लागणार आहेत. सध्या कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषघाने चार – चार खेळाडूंचे गट करण्यात आले आहेत.

या संर्धेत साधारण 70 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत हैद्राबाद, मुंबई , ठाणे, पुणे औरंगाबाद आणि नाशिकच्या काही खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळविल्या दर्जदार खेळाडूंचा समावेश आहे.

या स्पर्धेची तंत्रीक बाजू भारतीय गोल्फ युनियनचे माजी अध्यक्ष मा. ए. के. सिंग उपस्थित राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक समिती काम करणार आहे.

या स्पर्धेत व्यावसायिक गटात विजेता आणि उपविजेता ठरणार्‍या पहिल्या दोन स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तर इतर गटाच्या पहिल्या तीन क्रमांक मिळविणार्‍या खेळाडूंना आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे.

या स्पर्धाच्या आयोजनाकरीता नाशिक जिल्हा अध्यक्ष विंग कमांडर प्रदीप बागमार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, खजिनदार राजीव देशपांडे, सचिव नितीन हिंगमिरे, प्रशिक्षक आशिष केरोसिया , सदस्य स्नेहल देव, आनंद खरे आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधितांनी या स्पर्धेचे प्रमुख माजी विंग कमांडर प्रदीप बागमार, जिल्हा सचिव नितीन हिंगमिरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या