Wednesday, April 24, 2024
Homeनगरनदीपात्रातील खोदकाम प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

नदीपात्रातील खोदकाम प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

गॅस पाईपलाईनसाठी श्रीगोंदा शहरात सरस्वती नदीच्या पात्रात अनधिकृतरीत्या खोदकाम केले असल्याची बातमी सार्वमतमध्ये प्रसिद्ध झाली याची दखल घेत श्रीगोंदा पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी कॉटेक्स कंपनीच्या ठेकेदाराला नोटीस बजवण्याची तयारी केली असल्याचे सांगितले.

- Advertisement -

श्रीगोंदा शहरामधून जात असलेल्या भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड कंपनीच्या गॅस पाईपलाईन साठी नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता सरस्वती नदीत खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणार असल्याचे सांगत नागरीकांनी यास विरोध केला होता. तसेच शहरातील मुख्य रस्ते फोडून पाईपलाईन नेहण्यास भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला होता.

ठकेदाराकडून होत असलेली मनमानी व अनाधिकृत खोदकाम या प्रकरणी होणारा विरोध पाहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सबंधीत ठकेदारास नोटीस बजावली जाणार असल्याचे सांगीतले आहे. तसेच त्याच्या परवानग्या व नगरपालिकेतील सभेत याबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान रस्त्याच्या कडेने गॅस पाईपलाईनसाठी उकरलेल्या चारीतील मुरूम व दगड रस्त्याच्या मध्यभागापर्यंत पडल्याने अनेक ठिकाणी वाहनचालकांचे अपघात झाल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबतही नागरीकांचा रोष आहे.

शेतकरी, नागरीक विरोधात

भारत गॅस रिसोर्सेस पाईप लाईन श्रीगोंदा ,वडगाव, देऊळगाव ,भानगाव ,ढोरजा, कोथुळ ,मार्गे कोळगाव आणि पुढे नगरच्या दिशेने जाणार आहे. ही गॅस पाईपलाईनसाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम केले असल्याचा ठेकेदार सांगत असले तरी अनेक शेतकर्‍यांच्या शेतात जबरदस्तीने खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे आता नागरीक या विरोधात उतरत आहेत.

ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

सरस्वती नदीतील अवैध रित्या खोदकाम करून नदीच्या प्रवाहात अडथळा ठरणारे पाईप पालिकेने काढून टाकावेत.विनापरवाना काम करणार्‍या ठेकेदारवर ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप जिल्हा सचिव संतोष इथापे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या