Happy Birthday Riteish Deshmukh : बॉलिवूडला ‘वेड’ लावणारा अभिनेता रितेश देशमुख

jalgaon-digital
1 Min Read

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर छाप सोडणार सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुखचा आज वाढदिवस असून तो ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

रितेशने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमँटिक ड्रामा तुझे मेरी कसम पासून सुरू केली होती. त्याच्यासोबत जेनेलिया डिसुझा या चित्रपटात झळकली होती.

या चित्रपटातील अभिनयासाठी रितेशला फिल्म फेअरचा बेस्ड मेल डेब्यू अवॉर्डसाठी नॉमिनेशन देखील मिळाले होते. या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

मस्ती, क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, डबल धमाल, ग्रँड मस्ती, हाऊसफुल, टोटल धमाल, मरजावा, बागी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांने काम केले आहे.

सुरुवातीच्या काळात सतत विनोदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यामुळे त्याच्यावर विनोदी कलाकार हा टॅग बसला होता. आणि हेच पुसून काढण्यासाठी त्याने एकता कपूर हिच्या ‘एक विलन’ या सिनेमामध्ये सायको सीरियल किलरची भूमिका साकारली आणि त्याच्या करियरचा टर्निंग पॉईंट हा चित्रपट ठरला.

या चित्रपटाने त्याला अनेक अवॉर्ड्स देखील मिळवून दिले. त्याचप्रमाणे समीक्षकांनीदेखील रितेशचे भरभरून कौतुक केले होते. एक विलन या चित्रपटानंतर त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

मरजावा, बाघी, बेंजो, लयभारी अशा चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि आपण विविधांगी भूमिका साकारणारे एक उत्कृष्ट कलाकार आहोत हे सिद्ध करून दाखवले.

Share This Article