Friday, April 26, 2024
Homeजळगावयावल येथे दंगल ; परस्पर विरोधी बारा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

यावल येथे दंगल ; परस्पर विरोधी बारा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

यावल – प्रतिनिधी Yaval

यावल येथे चोपडा रोडवरील मोमीन वाड्यात दोन व तीन ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस अंगावर चिखल उडण्याच्या कारणावरून एकाच समाजातील दोन गटात झालेल्या भांडणात दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त यावल पोलीस निरीक्षक यांनी वाढविला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या घटनेत दोन्ही बाजूने सात जण जखमी झाले असून यावल येथून ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचार करून त्यांना औषधोपचारासाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले आहे तर परस्पर विरोधी दोन्ही पार्ट्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

शेख फारुक शेख फिर्यादी याचा नातेवाईक शेख शोएब शेख शकील यांचे अंगावर शेख शोएब शेख असलम यांनी चिखलाची शितोळे उडवले या कारणावरून आरोपींना राग आल्याने दोन ऑगस्ट 23 रोजी चोपडा रोड यावल शहरात संध्याकाळी सात वाजता व सकाळी तीन ऑगस्ट 23 रोजी सकाळी साडेअकरा वाजता कुरेशी मांडेवाला यांच्या दुकानासमोर सार्वजनिक ठिकाणी दोघ गटांमध्ये भांडण झाले आरोपी शेख अख्तर शेख करीम शेख अरशद शेख करीम शेख असलम शेख करीम शेख शोएब शेख अस्लम शेख अफजल शेख करीम शेख अफसर शेख करीम यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड घेऊन आरोपी अख्तर शेख करीम याने फिर्यादी यांचे हातातील लोखंडी रॉडने निसार शेख हमीद याचे डोक्यात रोड मारला तसेच शेख अस्लम शेख हमीद मुका याचे उजव्या हातावर आरोपी शेख शोएब शेख असलम यांनी लोखंडी रॉड ने मारून दुखापत केली आरोपी त्यांनी व फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना लाठ्या गाठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली या भांडण आवरण्यासाठी गेलेले नातेवाईक व येथील रहिवासी शेख अल्ताफ शेख फारूक शेख निसार शेख हमीद शेख असलम शेख हमीद शेख सोनू शेख निसार शे शोएब शेख शकील तसेच समोरच्या प्रतिस्पर्धी पार्टी मधील शेख अफजल शेख करीम शेख शमीम शेख हर्षद हे सात जण जखमी झालेले असून यावल ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करून जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे यातील आरोपींविरुद्ध शेक फारूक शेख युसुफ यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गुर नंबर 420/ 23 भादवी कलम 326; 324; 323; 143; 147 ;148; 149 ;504; 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक यावल राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण तपास करीत आहेत तर गुन्हा रजिस्टर नंबर 421 /23 मध्ये सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अर्शद करीम यांच्या फिर्यादीवरून पेरण मध्ये नाचण्याच्या वेळी अंगावर चिखल उडाल्यामुळे शेख निसार शेख हमीद गुड्डू शेख निसार शेख शोएब शेख शकील सोनू शेख निसार शेख फारूक शेख इरफान शेख यांच्याशी भांडण झाल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण हेच करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या