Thursday, April 25, 2024
Homeनगररिंगरोड बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

रिंगरोड बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील प्रस्तावित रिंग रोड बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याला संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली

- Advertisement -

असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता नगर शहरातून विविध राज्यांना जोडणारी महामार्ग आहेत. या महामार्गावर अवजड वाहतूक होते. वाहतुकीमुळे नेहमीच रस्ता कोंडी, अपघात आणि रस्त्यांची दुर्दशा होते. गेल्या अनेक वर्षापासून नगरकर या समस्यांचा सामना करत आहेत .

खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, नगर शहराच्या वाहतूक समस्येच्यादृष्टीने प्रस्तावित नगर बाह्यवळण रिंग रोड होणे अत्यंत गरजेचे आहे. रिंगरोड झाल्यानंतर विळद घाट, निंबळक, नेप्ती, केडगाव, अरणगाव ते वाळुंजपर्यंत हा रस्ता प्रस्तावित असून यामुळे शहरातील अवजड वाहतूकीपासून नागरिकांना दिलासा मिळेल.

नगर लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे सर्वप्रथम या वाहतूक कोंडीबाबत प्राधान्याने लक्ष घातले होते. हा रिंग रोड अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे. 2018 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली होती.

नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया गेल्या दोन वर्षांपासून या परवानगीच्या प्रतिक्षेत होते. खा. डॉ. विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे या रिंग रोडसाठी महत्वाच्या असणार्‍या संरक्षण खात्याच्या लष्करी हद्दीतून जाणार्‍या रस्त्यासाठी वर्किंग परमिशन मिळाली आहे. त्यामुळे लवकरच काम पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा खा. डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या