Friday, April 26, 2024
Homeनगररिक्षा चालकास जीवे मारण्याचा प्रयत्न

रिक्षा चालकास जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरुणाला फोन करून बोलावून घेत चाकू व बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. अल्ताफ अल्हाउद्दीन बागवान (वय 25 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्या कारणातून त्याला मारहाण झाली याची माहिती पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

प्रेम नरेंद्र भाकरे, कुबड्या ऊर्फ किरण दशरथ पालवे, ढाब्या ऊर्फ नाविण्य भाकरे, दीपक बेरड, भुर्‍या (पूर्ण नाव माहिती नाही), आशिष अशोक भाकरे (सर्व रा. नवनागापूर, अहमदनगर) व त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. नागापूर येथील सेंट मेरी चर्च येथे ही घटना घडली. फिर्यादी बागवान हा तरुण रिक्षा चालवतो. गुरूवारी रात्री 11 वाजता आरोपींनी त्याला फोन करून नागापूर येथील सेंट मेरी चर्च समोर बोलून घेतले.

बागवान येताच आरोपींनी त्याच्यावर चाकू हल्ला केला. तसेच बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. जखमी बागवान यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने रुग्णालयात पोलिसांना जबाब दिला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या