Saturday, April 27, 2024
Homeनगरशिर्डीत रिक्षा चालकाची हॉटेल मालकास मारहाण

शिर्डीत रिक्षा चालकाची हॉटेल मालकास मारहाण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथे हॉटेलसमोरून रिक्षा काढ म्हटल्याने रिक्षाचालकाने शिवीगाळ करत हॉटेल चालकाला माराहाण करून कडकडून चावा घेतला. ही घटना काल शिर्डीत घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शिर्डीत साईमूर्ती हॉटेल असून या हॉटेलच्या गेटसमोर भारत हिम्मत शेवाळे, (वय 32) रा.संतोषीनगर, शिर्डी याने त्याची रिक्षा उभी केली होती. तेव्हा हॉटेल चालक-मालक गोकुळचंद ओस्तवाल हे रिक्षा चालकास म्हणाले की, हॉटेलच्या गेटसमोरून रिक्षा काढून घे, असे म्हटल्याचा राग आल्याने भारत शेवाळे याने फोन करून काही रिक्षावाल्यांना बोलावले व शिवीगाळ करू लागला. तेव्हा स्वप्नील गोकुळचंद ओस्तवाल हा तरुण हॉटेलचालक रिक्षा चालकाला समजावून सांगत असताना त्याला रिक्षा चालक भारत शेवाळे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छातीवर दोन ठिकाणी कडकडून चावा घेतला.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात जखमी स्वप्नील ओस्तवाल यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भारत शेवाळे याच्याविरूद्ध भादंवि कलम 325, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. डाके पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या