Friday, April 26, 2024
Homeनाशिकइगतपुरी : भात पिकावर रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव

इगतपुरी : भात पिकावर रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव

घोटी | Ghoti

इगतपुरी तालुक्यात भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गापुढे संकट ओढवले आहे.

- Advertisement -

याबाबत शासनाने दखल घ्यावी व रोगामुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, पंचनामे करण्यात यावेत यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ सरसावले असून आज इगतपुरी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन देऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

इगतपुरी तालुक्यातील भातशेती धोक्यात आली असुन भात पिकांवर करपा, तुडतुडा, पांढरा टाका आदी रोगानी भात पिके उदवस्त झाली आहे.

त्यामुळे त्वरित कृषी विभागाने पीक पाहणी दौरा व पंचनामे करण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या