रियाज घेणार साई केंद्रातील प्रशिक्षणात सहभाग – रिजिजू

नवी दिल्ली – New Delhi

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून भेट म्हणून सायकल मिळविणारा 16 वर्षीय रियाज हा लवकर भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) मध्ये भारतीय सायकिलिंग महासंघ (सीएफआय) मध्ये प्रशिक्षण घेईल अशी माहिती केंद्रिय क्रीडा मंत्री किरण रिजिजूनी दिली. रियाज दिवाळीनंतर दिल्लीमधील इंदिरा गांधी मैदानात आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करेल.

केंद्रिय क्रीडा मंत्री रिजिजूनी सोमवारी टिवीट करत सांगितले की, रियाज लवकरच साईमध्ये प्रशिक्षण सुरु करणार असल्याने मी या बाबत आनंदी आहे. राष्ट्रपतीनी या युवा खेळाडूला ईदी निमित्त सायकल भेट देऊन प्रेरित केले होते. दिवाळीनंतर तो भारतातील उत्कृष्ट सायकिलिंग केंद्र दिल्लीतील आयजी मैदानावर प्रशिक्षण सुरु करेल.

यानंतर राष्ट्रपतीनी टिवीट केले की ज्यावेळी प्रतिभेला संधी मिळते तर यश हे मिळते. रियाजला लवकरच साईमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याचे ऐकून खूप आनंद झाला व तो साईमध्ये व्यवसायीक प्रशिक्षण घेऊ शकेल. दिर्घकाळाचा रस्ता त्याला गाठायचा आहे.

राष्ट्रपती कोविंद यांनी 30 जुलैला ईदीच्या आधी रियाजला सायकल भेट म्हणून दिली होती. रियाजने 2017 मध्ये दिल्ली राज्य सायकिलिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते. गुवाहाटीमध्ये झालेल्या शालेय क्रीडामध्येही त्याने चांगले प्रदर्शन केले होते. आर्थिक अडचणीच्या कारणानंतरही त्याच्या या यशाने राष्ट्रपती खूप प्रभावित झाले होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *