Tuesday, April 23, 2024
Homeनगरमहसूल पथकाने वाळू उपशाचे 8 चप्पू केले नष्ट

महसूल पथकाने वाळू उपशाचे 8 चप्पू केले नष्ट

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) परिसरात महसूल पथकाने (Revenue Team) अवैध वाळू उपशाविरोधात (Illegal Sand Mining) कारवाई केली. ज्ञानेश्वर मंदिराच्या मागे 8 चप्पू पाण्यातून ओढून नदीकाठावर आणले व जेसीबीच्या सहाय्याने तुकडे करुन आग (Fire) लावून पेटवून नष्ट केले.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या निर्देशाने नेवासा (Newasa) बुद्रुकच्या खंडोबा मंदीर, माळीची थडी, बिरोबा मंदीर परिसरात 30 ब यास वाळू जप्त (Seized) करण्यात आली. तसेच ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदीकाठी 8 चप्पू पाण्यातून नदीकाठावर ओढून आणून जेसीबी यंत्राद्वारे त्याचे तुकडे कुन पेटवून नष्ट करण्यात आले.

‘दक्षिणे’च्या मैदानात थोरात की गडाख ?

तहसीलदार संजय बिरादार यांचे उपस्थितीत मंडळ अधिकारी अनिल गव्हाणे, तलाठी अण्णााहेब दिघे, मंडळअधिकारी बाबासाहेब माने, तलाठी प्रदीप चव्हाण, रस्तापूरचे तलाठी घनशाम नांगरे, पटीचे तलाठी गणेश घुमरे, कोतवाल बाळासाहेब चौधरी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

या कारवाईमुळे अवैध गौणखनिज उत्खनन (Illegal Minor Mineral Mining) रोखण्यास मोठी मदत होईल असा विश्वास तहसीलदार श्री. बिरादार यांनी व्यक्त केला.

कबुतर चोरीच्या संशयावरून मुलांना अमानुष मारहाण

सदरच्या काटवाईने गौण खनिज उत्खनन करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारची कारवाई वेळोवेळी केली जाईल असे तहसीलदार यांनी यावेळी सांगितले. गौणखनिज उत्खनन करताना रितसर शासनाची परवानगी घेणे. रॉयटी शासन जमा करून वाहतूक केल्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही असेही तहसिलदार म्हणाले.

नगर तालुक्यासाठी आणखी एक एमआयडीसी !

- Advertisment -

ताज्या बातम्या