Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआठवडाभरात विषय मार्गी लावतो; महसुलमंत्र्यांचे कर्मचारी संघटनेला आश्वासन

आठवडाभरात विषय मार्गी लावतो; महसुलमंत्र्यांचे कर्मचारी संघटनेला आश्वासन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या आठवडाभरात तुमचे सगळे विषय मार्गी लावतो, तुमच्या सगळ्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. नायब तहसीलदार हा संवर्ग विभागस्तरावरील आहे. याबाबत आम्ही देखील सकारात्मक आहोत, मात्र सामान्य प्रशासन विभागाने यात त्रुटी काढली असल्याने हा विषय प्रक्रियेत आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (revenue minister balasaheb thorat) यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले….

- Advertisement -

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज नाशिक (Nashik Tour) दौऱ्यावर असताना महसूल कर्मचारी संघटनेने भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकारी यांनी आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची विनंती केली.

तेव्हा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (revenue minister balasaheb thorat) यांनी नायब तहसिलदार हा संवर्ग विभागीयस्तरावर ठेवावा हे आमचे मत आहे. परंतु, सामान्य प्रशासन विभागाने त्यात त्रुटी काढलेली असल्याने प्रक्रियेत आहे. तसेच इतरही मागण्या विषयी देखील संचिका सामान्य प्रशासन विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यावर लवकरच मार्ग काढण्या बाबत आमचे प्रयत्न चालु आहे. संपामुळे जनतेचे हाल होत आहेत तरी आपण संप मागे घ्यावा, असे सांगितले.

यावेळी चर्चा करतांना अध्यक्ष दिनेश वाघ, कार्याध्यक्ष तुषार नागरे, कोषाध्यक्ष रमेश मोरे, संघटक जिवन आहेर, पदोन्नत नायब तहसिलदार पोपटराव सोनवणे, प्रविण गोंडाळे, विलास वैद्य, दिनेश पाडेकर तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सचिन पोतदार, नितीन गांगुर्डे, ब्राहीकर, आदित्य परदेशी, तुषार सुर्यवंशी, आनद लगरे, अनिल वैद्य. अमोल हांडगे, अरुन तांबे इ. महसुल कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या