Monday, April 29, 2024
Homeनगरमहसूलचे कर्मचारी बेमुदत संपावर

महसूलचे कर्मचारी बेमुदत संपावर

अहमदनगर / मुंबई

मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील तब्बल २२ हजार महसूल कर्मचाऱ्यांनी (Revenue Dept employees) बेमुदत संप (indefinite strike) पुकारला आहे. नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील १६०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे. महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादित पार पाडावी. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० रुपये करावा. २७ नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-३ पदावर पदोन्नती द्यावी या मागण्यांसाठी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूलच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ज्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात ओस पडलेली पाहायला मिळत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून रिक्त पदाची भरती करण्याची मागणी होत आहे, तर ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध होत नसल्याने दोन वर्षांपासून नायब तहसीलदारांना पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळा, कुणी कोरलं नाव?, पाहा विजेत्यांची यादी

- Advertisment -

ताज्या बातम्या