Friday, April 26, 2024
Homeनगरमहसूल व गौण खनिज पथकाने अवैध वाळूची दोन वाहने पकडली

महसूल व गौण खनिज पथकाने अवैध वाळूची दोन वाहने पकडली

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर, जाफराबाद शिवारात काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गौण खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी छापा टाकून जाफराबाद शिवारातून अनधिकृत वाळू उपसा करणारे दोन डंपर पकडले. ते डंपर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

- Advertisement -

गोदावरी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून गौण खनिकर्म अधिकारी वसिम सय्यद यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा गोदापट्ट्यातील वाळू तस्करांनी मोठा धसका घेतला आहे. तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या अहवालानुसार जाफराबाद शिवारात अनधिकृतरित्या गौण खनिज वाहतूक करणारे डंपर क्रं. एम. एच. 14 ड 9869 यासह विना क्रमांकाचा एक असे दोन डंपर ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा गौण खनिकर्म अधिकारी वसिम सय्यद यांच्यासह पथक प्रमुख राजेश घोरपडे, प्रविण सूर्यवंशी, कामगार तलाठी ए. जे. तेलतुंबडे, ज्ञानेश्वर हाडोळे, अशोक चितळकर, श्री. सांगळे आदींनी ही कारवाई केली.

दरम्यान गोदावरी पट्ट्यातील सराला, गोवर्धन, रामपूर, नाऊर, जाफराबाद, नायगाव, मातुलठाण सह वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव गंगा, वांजरगाव आदी भागातून अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून गौण खनिकर्म अधिकारी वसिम सय्यद यांनी लक्ष घातल्याने बर्‍याच अंशी वाळू तस्करामध्ये दहशत निर्माण झाली आहे. या वाळू पट्ट्यात अनेक गाव पुढारी यांचे या धंद्यात संगममत असल्याचे बोलले जात असून ठराविक काही पत्रकारांना यात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या