Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे निधी परत

निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे निधी परत

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मालेगाव (malegaon) मध्यचे आ. मौलाना मुफ्ती (mla maulana mufti) यांच्या निष्क्रियतेमुळेच चार कोटीपैकी तीन कोटी आठ लाखांचा निधी (fund) विकासकामांवर खर्च न झाल्यामुळेच परत गेला आहे.

- Advertisement -

मनपास विकासकामे करण्यात अडथळे आणायचे व विकासकामे संथगतीने होत असल्याबद्दल विधानसभेत प्रश्न विचारायचे असे हास्यास्पद राजकारण (politics) मौलाना करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) माजी आ. शेख रशीद (former mla sheikh rashid) यांनी शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक संपुष्टात आल्यामुळेच गुन्हेगारीने (crime) कळस गाठला असल्याची टिका येथे बोलतांना केली.

येथील नुरबागेतील शकील बेग यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आ. शेख रशीद यांनी एमआयएम आ. मौलाना मुफ्ती यांच्यासह पोलीस यंत्रणेवर टिकास्त्र सोडले. शहरात मनपाच्या माध्यमातून आज सुमारे 40 ते 50 कोटींची विकासकामे सुरू आहेत. रस्ते (road), भुमीगत गटार (Underground sewers), गटार (Gutter), पथदीप (Streetlight) आदी विविध विकासकामे मनपातर्फे साकारली जात आहे. तर दुसरीकडे मात्र आ. मौलाना मुफ्ती यांचा 3 कोटी 8 लाखांचा निधी विकासकामांअभावी परत गेला आहे. मौलाना यांनी 4 कोटीपैकी फक्त 92 लाखांचा निधी खर्च केला आहे.

जो आमदार स्वत:चा निधी देखील विकासकामांसाठी खर्च करू शकत नाही तो शहराचा काय विकास करू शकेल याचा विचार जनतेने करण्याची गरज आहे. एकिकडे उड्डाणपुलासह (flyover) मनपाच्या विविध विकासकामांना अडथळे आणायचे व दुसरीकडे मात्र विधानसभेत उड्डाणपुलाचे काम संथगतीने होत असल्याबद्दल प्रश्न विचारायचा असा उद्योग मौलाना मुफ्ती यांनी सुरू केला आहे. यंत्रमागाच्या वीज समस्येबद्दल प्रश्न न विचारता शेतकर्‍यांना (farmers) वीज कां देत नाही याबद्दल ते प्रश्न विचारतात.

यावरूनच शहरातील यंत्रमाग धारकांबद्दल त्यांना किती काळजी आहे हे दिसून येते, अशी टिका करत शेख रशीद यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली. अजीज मास्टर या प्रतिष्ठीत व्यक्तीच्या घरावर रात्री 1 वाजून 40 मिनीटांनी पोलीस छापा मारून झडती घेतात. गुन्हेगारांवर कारवाई नाही मात्र प्रतिष्ठीत नागरीकांना त्रास दिला जात आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या