Friday, April 26, 2024
Homeनगरपेन्शनसाठी सेवा निवृत्त तलाठ्याने घेतला कुटुंबियांसह स्वतःच्याच घरात आत्मदहनाचा निर्णय

पेन्शनसाठी सेवा निवृत्त तलाठ्याने घेतला कुटुंबियांसह स्वतःच्याच घरात आत्मदहनाचा निर्णय

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सेवा निवृत्त तलाठी आसाराम निवृत्ती बऱ्हाटे (वय 64 वर्षे) यांना सेवा निवृत्त होऊन 6 वर्ष होऊनही निवृत्ती वेतन (पेन्शन) मिळत नसल्याने

- Advertisement -

त्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कुटुंबासह स्वतःच्याच घरात आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्हाटे यांनी अनेकदा शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून देखील त्यांना न्याय मिळत नाहीये.त्यामुळे येत्या 25 जानेवारी पर्यंत मला व कुटुंबियास न्याय न मिळाल्यास दि.26 जानेवारीला कुटुंबियांसह सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

त्यांनी निवेदनात म्हंटले आहे कि, मी गेल्या 10 वर्षांपासून अंथरुणावर आहे ,मरणाच्या दारात उभा आहे .मी शिंगवे तुकाई,ता-नेवासा जि-अहमदनगर येथे तलाठी पदाच्या सेवेत कार्यरत असताना तहसीलदार नेवासा यांचेमार्फत वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छा निवृत्ती होणेबाबत उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचे कडे दि.30 ऑगस्ट 2012 रोजी विहित नमुना फॉर्म सी व प्रतिज्ञापत्रा सह अर्ज केला होता.

त्यास अनुसरून उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांनी मला फी.25 सप्टेंबर 2012 रोजी पुढील शासकीय सेवेसाठी अपात्र असले बाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमानपत्र सादर करणेविषयी लेखी पत्राद्वारे कळवले होते.

मी ससून पुणे हॉस्पिटल यांचेकडील प्रमाणपत्र दि.22 एप्रिल 2013 ला उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे समक्ष सादर केला.दि.15 ऑगस्ट 2013 रोजी नवीन उपविभागाची निर्मिती झाली.नेवासा तालुका हा नगर विभागास जोडन्यात आला .या समयी माझे पूर्वीचे वैयकीय सेवा निवृत्ती प्रकरण विचारात न घेतल्याने मी ऑगस्ट 2013 पुनःश्च अर्ज सादर केला त्यानुसार मला दि.25 फेब्रुवारी ब2014 रोजी शासन सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले.

तसेच मला मार्च 24 ते ऑगस्ट 14 चे तात्पुरते स्वेच्छा निवृत्ती वेतन मिळालेले असून त्यानंतर सप्टेंबर 2014 पासून आज पर्यंत कुठलेही निवृत्तिवेतन मिळालेले नाही.

तरी सदर स्वेच्छानिवृत्ती प्रकरण तहसीलदार नेवासा यांच्या मार्फत तात्काळ महालेखापाल मुंबई यांच्याकडे सादर व्हावे ही विनंती. मला गेले 6 वर्षे दोन महिने पासून निवृत्ती वेतन मिळालेले नाही .माझ्या कुटूंबियावर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे .मुलाचे शिक्षन व मुलीचे लग्न पैशाअभावी मुश्किल झाले आहे तसेच याबाबत आम्ही वेळोवेळी लेखी तोंडी पाठपुरावा केलेला आहे तरी काहीच कार्यवाही झालेली नाही.

यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. माझ्यावर चंद्रकला आसाराम बऱ्हाटे (पत्नी), अश्विनी आसाराम बऱ्हाटे (मुलगी), ज्ञानेश्वर आसाराम बऱ्हाटे (मुलगा) या कुटुंबातील व्यक्ती अवलंबून आहेत. तरी माझ्या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करावी. मला देय लाभ मिळावे तसेच मला व माझ्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही विनंती.

दि.25 जानेवारी 2021 पर्यंत मला व माझ्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास दि.26 जानेवारी 2021 रोजी मी व माझे कुटुंब स्वतःच्या घरात आत्मदहन करणार करून आमचे जीवन संपवणार आहोत. सदर गोष्ट करण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तरी आम्ही मरण पावल्यास त्यास सर्वस्वी आपण व संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी जबाबदार असेल असे ही निवेदनात म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या