गाडी चालवत असतानाच लष्करी अधिकारी झाले अत्यवस्थ; नागरिकांनी तोडली काच…

jalgaon-digital
2 Min Read

देवळाली कॅम्प | वार्ताहर Deolali Camp

येथील हौसनरोडवर (Houasan Street) लोकाश्रय मिठाई दुकानासमोर सेवावृत्त कर्नल आर पी नायर (Lieutenant colonel R P Nair) याची प्रकृती अचानक बिघाडल्याची घटना घडली. अत्यवस्थ परिस्थितीत त्यांनी गाडी रस्त्यावरच उभी केली. पोलीस व नागरीकांच्या प्रसंगावधानामुळे गाडीची काच तोडून त्यांना बाहेर काढत त्वरित लष्करी हाॅस्पिटल (Army Hospital) मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वेळीच उपचार सुरु झाले असून परिस्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिली….

अधिक माहिती अशी की, काल (दि ६) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त कर्नल आर पी नायर हे आपल्या गाडी क्र MH15 HM7031ने हौसनरोडने जात असताना लोकाश्रय मिठाई या दुकानासमोर त्यांची गाडी अचानक थांबली.

यावेळी दोन्ही बाजुची वाहातुक थांबली. गाडी पुढे जात नाही व वाहातुक खोळबली याच दरम्यान गुन्हे शाखेचे युनिट २ चे सहायक सह पो नि शामराव भोसले तसेच देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन चे एन एस भुजबळ व बांगर हे गर्दी च्या ठिकाणी आले.

सामाजिक कार्यकर्ते मंगेश शिदोडे, बबन काडेकर, विलास संगमनेर, संदीप मोगल, अंबादास पाळदे, सुनिल पगारे आदींनी गाडीतील व्यक्ती ला त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी पोलिसांनी जवळच जात असलेल्या सेवानिवृत्त जवानांच्या मदतीने काच फोडली असता आतील इसमाची प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने लष्करी हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर वेळीच उपचार झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती उत्तम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *