लंपीमुळे मयत जनावरांचे फेरसर्वेक्षण : पशुसंवर्धन मंत्र्यांचे आदेश

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या पशुधनावर लंपी (Lumpy on livestock) या आजाराचा (illness) मोठ्या प्रमाणात संसर्ग (infection) झाला आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) 392 जनावरांना (392 to animals) या आजाराची लागण (Contagion of disease) झाली असून आत्तापर्यंत 12 जनावरांचा मृत्यू (12 animals died) झाल्याची माहिती (Information) पशुसंवर्धन विभागाचे (Commissioner of Animal Husbandry Department) आयुक्तांनी दिली. मात्र मयत जनावरांची संख्या अधिक असून ही आकडेवारी चुकीची (Statistics wrong) असल्याचा दावा आमदारांनी (MLAs) केला आहे. दरम्यान मयत जनावरांची नेमकी (Order to re-survey) संख्या किती? यासाठी जिल्हाधिकारी आणि सीईओंना फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री (Minister of State for Revenue and Animal Husbandry) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज दिले.

राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आज जिल्हा दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी जिलह्यातील गाई-म्हशींमधील लंपी या आजाराच्या प्रादुर्भावाबाबत तालुक्यांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणांची आढावा बैठकही घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार राजुमामा भोळे, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती म्हणून सरकारने मदत करावी – खडसे

जळगाव जिल्ह्यात लंपीचा संसर्ग वाढत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी कर्ज काढुन विकत घेतलेले जनावरे मृत्युमूखी पडत आहेत. तसेच लंपीला प्रतिबंध करण्यासाठी जी लस दिली जात आहे ती गाई वर्गीय नसून शेळी,मेंढी वर्गीय आहे. त्यामुळे लसीचे अद्ययावतीकरण करावे. जनावरांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठीची यंत्रणाही तोकडी आहे. राज्य सरकारने जनावरांचा जनरल इंशुरन्स काढावा, लंपीचा नैसर्गिक आपत्तीत समावेश करून ज्या शेतकर्‍यांची जनावरे मयत झाली आहेत त्यांना 35 हजार रूपये मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.

मयत जनावराच्या आकड्यांचे गोलमाल

लंपीमुळे केवळ 12 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. प्रशासनाच्या या माहितीवर आ. अनिल पाटील, खा. उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी, खा. रक्षा खडसे, आ. राजुमामा भोळे, आ. संजय सावकारे, आ. लता सोनवणे यांनी बैठकीतच आक्षेप घेतला. त्यामुळे मृत्यू झालेल्या जनावरांची नेमकी संख्या किती? यासाठी फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिले आहेत.

पशूपालकांना तातडीने दहा हजार देणार

जिल्ह्यात ज्या पशुपालकांच्या जनावरांचा लंपी या आजारामुळे मृत्यू झाला आहे, अशांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रूपये देण्याची घोषणा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत केली. तसेच शेतकर्‍यांना जनावरांच्या उपचारासाठी लागणारा खर्च देखिल सरकार करणार असून जनरल इंशुरन्स आणि अनुदान देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संकटकाळात राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचेही ना. विखेपाटील यांनी स्पष्ट केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *