Twitter वर Blue Tick आणण्यासाठी इथे क्लिक कराच…

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली I वृत्तसंस्था

ट्विटरची अकाउंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया तीन वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर आलेल्या सर्व व्हेरिफिकेशन रिक्वेस्ट तपासण्यासाठी मध्येच अचानक काही काळ ती बंद करण्यात आली होती. आता ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे…

ट्विटर अकाउंट अधिकृत आहे, हे युजर्सला कळण्यासाठी व्हेरिफाइड ब्लू बॅजचा उपयोग होतो. ऑथेंटिक, नोटेबल आणि अ‍ॅक्टिव्ह अर्थात अधिकृत, दखलपात्र आणि सक्रिय अकाउंट्स व्हेरिफाइड ब्लू बॅजसाठी अर्ज करण्याकरता पात्र ठरू शकतात.

ट्विटरवर आपली अधिकृतता सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. प्रोफेशन अर्थात पेशा आणि कामाची दिशा यानुसार व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेत थोडाफार बदल असतो.

ट्विटरच्या म्हणण्यानुसार, ‘नोटेबल’ अर्थात दखलपात्र अकाउंट्स एखाद्या प्रस्थापित संस्थेने किंवा कंपनीकडून उद्धृत केली गेलेली असावीत. ‘ऑथेंटिक’ म्हणजे अधिकृतता ठरवण्यासाठी अकाउंटवरील प्रोफाइल फोटो, स्वतःची माहितीआणि अन्य प्राथमिक माहिती पूर्ण भरलेली असली पाहिजे. ‘अ‍ॅक्टिव्ह’ म्हणजे संबंधित अकाउंट गेल्या सहा महिन्यांत सक्रिय असले पाहिजे.

या प्रक्रियेला पात्र ठरण्यासाठी युजर्सनी ई-मेल अ‍ॅड्रेस आणि फोन नंबर कन्फर्म केलेला असला पाहिजे. अर्ज करण्याआधीच्या सहा महिन्यांत ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन झालेले असता कामा नये, असे ट्विटरने म्हटले आहे.

कोण करू शकते खाते वेरीफाईड?

सरकारी संस्था आणि सरकारी अधिकारी, वृत्तसंस्था आणि पत्रकार, कंपन्या, ब्रँड्स, संस्था-संघटना, मनोरंजनविषयक संस्था आणि व्यक्ती, क्रीडा प्रकारांच्या टीम्स, संस्था आणि खेळाडू, कार्यकर्ते, ऑर्गनायझर्स, प्रभावी व्यक्तिमत्त्वं आदींना ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातली व्यक्तिमत्त्वं आणि धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातले गुरू आदींनाही यासाठी अर्ज करण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *