Friday, April 26, 2024
Homeनाशिकसेपी स्कोअर वाढल्याने उद्योगांवर निर्बंध

सेपी स्कोअर वाढल्याने उद्योगांवर निर्बंध

सातपूर l Satpur प्रतिनिधी

नाशिकच्या प्लेटिंग व सरफेस कोटिंग उद्योगांचे प्रश्न नव्याने वाढतच चालले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिकचा सेपी स्कोअर 69 झाला असल्याचे सांगून परवाने नूतनीकरण करण्यास नकार देतात कारखान्यांना क्लोजर नोटीस देण्याचे आदेश प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे उद्योग क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

नाशिकचा सेपी स्कोअर 69 कसा? हा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या संकेत स्थळावर मागील काही वर्षांचे सेपी स्कोअर सादर केलेले आहेत त्या आकडेवारीवरुन एकूण 69 हा स्कोर सरासरीतही कुठेच येत नाही त्यामुळे ही आकडेवारी कुठून आली ? हा प्रश्न उद्योग क्षेत्रातील उपस्थित केला जात आहे.

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल कोर्टाने डिसेंबर 18 मध्ये दिलेल्या निकालानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सेपी स्कोअर 69 झाल्यामुळे नाशिक औद्योगिक क्षेत्र परिसरात नवीन उद्योगांना परवाना मिळणार नाही. प्रस्थापित उद्योगांना विस्तारीकरणाची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्लेटिंग उद्योगाला नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

सेपी स्कोअर काय आहे?

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या आकडेवारीवरून ठराविक कालावधीतील हवा, जल, जमिनीवरील प्रदूषणाची टक्केवारी सादर केली आहे. या आकडेवारीच्या टक्केवारीची सामायिक सरासरी वरून सेपी स्कोअर तयार होत असतो.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेत स्थळावरील आकडेवारीत फेब्रुवारी 19 चा अहवाल नोंदवलेला आहे त्यानंतरची नोंद करण्यात आलेली नाही यात जून 19, फेब्रुवारी 20 व जून 20 ची नोंद नाही त्या अहवालाचीही तपासणी गरजेची होते प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवलेल्या 2019 च्या आकडेवारीच्या अनुषंगानेही सेपी स्कोअर 69 होत नसल्याने हा आकडा कुठून आणला ?असा प्रश्न उद्योग क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.

औद्योगिक क्षेत्रातील मंदीचा परिणाम प्लेटिंग उद्योगांवरही झालेला आहे. व्यवसाय निम्म्याहून खाली आलेला असल्याने आधीच व्यवसायिक त्रस्त आहेत. त्यात सेपी स्कोअर मुळे आलेले निर्बंध व लावण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांसाठीचे अटी यामुळे आता व्यवसाय सुरू ठेवावा की बंद करावा? या निर्वाणीच्या निर्णयापर्यंत उद्योजक आले असल्याचे चित्र आहे.

प्रत्यक्षात नाशकात जलप्रदूषणाची बोंब आहे. त्यावेळी या अहवालातील जलप्रदूषणाची आकडेवारी पाहता सेपी स्कोअर 50 च्या ही खुपच कमी राहण्याची शक्यता आहे.

सेपी स्कोअर

हवा जल जमिन सरासरी

फेब्रुवारी-19

35.5 42 .7 38.5 46.1

जून-18

39 31 41.3 46.8

फेब्रूवारी-18

26.9 31.8 30.1 33.9

जुन-17

38.8 31.4 31. 44.7

फेब्रूवारी-17

48 43.5 42 57.5

केंद्राचा अहवाल-2009

55.2 52.5 46 66.06

न्यायालयापुढे सादर केलेली आकडेवारी अपुर्णअसून योग्य आकडेवारी सादर करण्याची गरज आहे. नाशिक परिसरातील प्रदूषणाची पातळीही कमी असताना चुकीच्या आकड्यांमुळे सेपी स्कोअर वाढून अनावश्यक बंधने लादली गेली आहेत.

– समीर पटवा,संचालक मंडळ सदस्य, प्लेटिंग संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या