Friday, April 26, 2024
Homeनगरहॉटेल व्यवसायिकांवरील निर्बंध हटवा

हॉटेल व्यवसायिकांवरील निर्बंध हटवा

अहमदनगर|Ahmedagar

करोना रूग्णसंख्या कमी झाल्याने नगर शहर (Nagar City) व जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांवर (On hoteliers in the district) लादलेले निर्बंध हटविण्यात यावेत, अशी मागणी (Demand) नगर जिल्हा हॉटेल व परमिट रूम असोसिएशनच्यावतीने (On behalf of Nagar District Hotel and Permit Room Association) करण्यात आली आहे.

- Advertisement -

असोसिएशनच्यावतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष हेमंत जाधव, उपाध्यक्ष प्रदीप पंजाबी, सचिव डॉ. अविनाश मोरे आदी यावेळी उपस्थित होते. असोसिएशनने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांना निवेदन दिले आहे. करोनामुळे (Covid 19 Problem) हॉटेल व्यवसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. संकट काळात हॉटेल व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले, तरीही आता व्यवसायिकांवर जाचक निर्बंध लादण्यात (Imposing restrictions)आलेले आहेत.

हॉटेल व्यवसायिकांवर बँकेचे कर्ज (Bank Loan) आहे, कामगार पगार(Workers Payment), वीज बिल (Electricity Bills), व्हॅट यासारखे अनेक खर्च (Expenses) हॉटेल व्यवसायिकांना कर्ज काढून करावे लागत आहे. शहरात रूग्णसंख्या कमी झाली असून दररोज 18 ते 20 रूग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत हॉटेल व्यवसायिक प्रशासनाला पूर्णत: सहकार्य करत आहे. परंतु अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायिकांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी देखील प्रशासनाची आहे. हॉटेल व्यवसायिकांवर हजारो जणांचे कुटूंब चालतात या सर्व बाबींचा विचार करून हॉटेल व्यवसायिकांवरील निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी (Demand) करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या