Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याब्रह्मगिरी परिसरातील प्रतिबंंधित क्षेत्र निश्चित

ब्रह्मगिरी परिसरातील प्रतिबंंधित क्षेत्र निश्चित

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गठीत करण्यात आलेल्या कार्यदलाच्या प्रथम सभेत ब्रह्मगिरी परिसरातील पर्यावरणीय संंरक्षणसाठी प्रतिबंंधित क्षेत्र निश्चित करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी कार्यदल सदस्यंांंची नावे निश्चित करण्यात आली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण प्रेमींची बैठक झाली. या बैठकीस जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, संस्था व त्यांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील सुरु असलेल्या विविध प्रकारच्या विकासकामांसाठी दगड, माती, मुरुम, खडी इत्यादी गौण खनिजाची आवश्यकता भासते. जे गट जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट केलेले आहेत.अशा गटातून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता होत असल्यास उत्खननाची परवानगी देण्यात येते. अशा उत्खननाबाबत काही प्रकरणात अनधिकृत उत्खननाबाबत जनतेच्या तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती, संस्थांच्या तक्रारी प्राप्त होतात.

या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संंतुलन राखण्यासाठी कार्यदलाची स्थापना करण्यात आल्याचे मांढरे यांनी सांगून त्यावर सर्व समावेशक निर्णय घेण्यासाठी कार्यदल स्थापन्याचा निर्णय प्रथमच घेण्यात असल्याचे त्यांंनी स्पष्ट केले. त्यासाठी झेड,एम व ओ असे तीन झोन निश्चित केले. झेड(प्रतिबंधित) झोन मध्ये कोणत्याही परीस्थीतीत उत्खननाला परवानगी दिली जाणार नाही. एम(वाटाघाटीचा)त काही अटी शर्ती घालून परवानगी दिली जाईल. ओ(खुला) झोनमध्ये सर्वबाबी तपासून परवानगी दिली जाईल. मात्र त्यात इतर कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाहीअसे त्यांनी स्पष्ट केले.

अशी आहे समिती

वन, पुरातत्व, जैवविविधता. इतिहास संशोधन, आदिवासी कला संस्कृृती, कायदा अशा क्षेत्रातील तज्ज्ञांंची नावे कार्यदलसाठी निश्चित करण्यात आली. त्यात राम खुर्दळ, योगेश कापसे, अश्वीनी भट, रोहन देशपांंडे, प्रशांंत परदेशी, संजय अमृतकर, मनीष बावीस्कर, देवचंंद महाले, दिगंंबर काकड, तुषार पिंगळे, दत्तू ढगे, हिरेन चौधरी, वैभव देशमुख, अंबरीश मोरे, दीपक जाधव, जगबिर सिंग, प्रकाश निकुंभ, निशिकांंत पगारे, शाम देशमुख, रुद्रशर्मा लोहगावकर, आदींचा समावेश करण्यात आला.

पर्यावरण प्रेमींच्या मागण्या

पश्चिम इको घाटातील प्रतिबंधित क्षेत्राचे सीमांकन करा, अवैध खोदकाम खाणकामांच्या तक्रारींसाठी सार्वजनिक फोन नंबर जाहीर करा, ब्रह्मगिरी व अंजनेरीच्या दहा कि.मी. परिघात राखीव क्षेत्र जाहीर करा, या क्षेत्रात सुरु असलेले उत्खनन बंंद करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या