Friday, April 26, 2024
Homeनाशिकसप्तशृंगी गडावरील विश्रामगृह सुरु होणार

सप्तशृंगी गडावरील विश्रामगृह सुरु होणार

सप्तशृंगीगड । वार्ताहर | Saptashringigad

उत्तर महाराष्ट्राच्या (North Maharashtra) आई सप्तशृंगीच्या पुण्य पावन नगरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे सप्तशृंगीगड (Saptashringigad) परिसरातील विश्रामगृह (Rest house) बेवारस अवस्थेत दिसून येत असून

- Advertisement -

विश्रामगृह बनला तळीरामाचा अड्डा या मथळ्याखाली दैनिक देशदूतने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच आमदार नितीन पवार (mla nitin pawar) यांनी या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाशी संपर्क साधून लवकरच विश्रामगृह सुरु करुन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येईल, असे प्रतिपादन केले.

सप्तशृंगगडावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) शासकीय विश्रामगृह बनले तळीरामांचा अड्डा हे वृत्त दैनिक देशदूत वर्तमानपत्रात प्रसिध्द होताच कळवण (kalwan) – सुरगाणा (surgana) विधानसभेचे (vidhan sabha) आमदार नितीन पवार यांनी तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागांना सूचना केल्या. येथे रात्रीच्या वेळी दारुडे दारु पिऊन धिंगाणा घालतात. त्यामुळे परिसराचे शांतता भंग होत आहे.

विश्रामगृहातच दारुच्या बाटल्या पडलेले दिसून येत असल्याने विश्रामगृह तळीरामाचा अड्डाच बनला असताना दैनिक देशदूतने याची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची स्थानिक आमदार नितीन पवार यांनी दखल घेत लवकरच सप्तशृंगी गडावर सुरक्षारक्षक देवून विश्रामगृह लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले असून तरी ते लवकरच सुरु व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या