Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसमाजकल्याण सेवकांचे प्रश्न निकाली

समाजकल्याण सेवकांचे प्रश्न निकाली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

समाजकल्याण विभागाने (Social Welfare Department) गतिमान प्रशासनाबरोबरच नवनवीन उपक्रम राबवत विभागाच्या सेवकांचे विविध प्रश्न निकाली काढले आहेत. समाजकल्याण आयुक्तालयाने एक प्रकारे सेवकांना सेवाविषयक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रलंबित प्रश्न निकाली निघाल्याने सेवकांकडून समाधान व्यक्त केले जात आहेत…

- Advertisement -

राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Naranware) यांनी विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागात अनेक नव-नवीन उपक्रम राबवण्याबरोबरच कामकाजात अधिक गतिमानता निर्माण केली आहे.

ज्या सेवकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात गतिमानतेने निर्णय झाल्याने संबंधित सेवक यांनी आयुक्त यांना भेटून धन्यवाद व्यक्त केले आहेत. समाजकल्याण निरीक्षक संवर्गातून गृहपाल संवर्गात पदोन्नती झालेल्या श्रीमती मुलानी यांना 2019 पासून पात्र असून पदोन्नती मिळत नव्हती.

मात्र आयुक्तांच्या सकारात्मक विचारामुळे पदोन्नतीचा (Promotion) प्रश्न निकाली निघाला. सोयीच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. प्रशांत हेळकर (Prashant Helkar) यांची गृहपाल संवर्गात पदोन्नती झाली आहे. त्यांनीदेखील कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुकिंदा मोरे (Mukinda More) यांनी त्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिल्याने समाधानी असल्याचे सांगितले. प्रदीप भालके यांना त्यांच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने नियुक्ती दिली गेली.

पल्लवी मुंढे (Pallavi Mundhe) यांनी देखील त्यांच्या पतीच्या करोनामुळे (Corona) निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत त्यांच्या जागी अनुकंपावर जलद गतीने नियुक्ती दिल्याने त्यांनीही आयुक्तालयाचे आभार व्यक्त केले.

सेवकांच्या सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने लाभ मंजूर करण्यात आले आहेत. सहाययक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी, कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, निलंबित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत पुर्नस्थापित करणे, कर्मचाऱ्यांना अर्हताकारी/सेवाप्रवेशोत्तर परीक्षेपासून सूट मंजूर केली, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर तसेच कर्मचाऱ्यांना वैदयकीय प्रतिपूर्तीचा लाभ दिला, जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांना प्रतिनियुक्तीस मान्यता प्रदान केली, स्वीय सहाय्यक व गृहपाल या संवर्गातील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली.

गृहपाल प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचार्‍यांना प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण बार्टी मार्फत देण्यात आले, कर्मचार्‍यांचे प्रलंबित रजा प्रकरणे मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण, कर्मचारी अधिकार्‍यांची सेवा पुस्तके अद्यावत करणे. यासारखे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आली आहेत. तसेच विभागातील सर्व संवर्गातील कर्मचारी यांच्या विभागीय परीक्षा संदर्भातदेखील युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत असून लवकरच परीक्षा (Exam) घेण्यात येणार आहेत.

समाजकल्याण विभागाने समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातूनच विभागाच्या कामकाजाची गतिमानता वाढली असून सर्व स्तरातून विभागाच्या कामकाजाचे कौतुक करण्यात येत आहे.

– हरीश डोंगरे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन), समाज कल्याण आयुक्तालय

- Advertisment -

ताज्या बातम्या