Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांचा निर्णयांचा धडाका; विधानसभेत 'हे' ठराव मंजूर

मुख्यमंत्र्यांचा निर्णयांचा धडाका; विधानसभेत ‘हे’ ठराव मंजूर

मुंबई | Mumbai

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session) आजचा शेवटचा दिवस असून अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत..

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत औरंगाबाद (Aurangabad) शहराचे संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव (Dharashiv) नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला आहे. यासोबतच नवी मुंबई विमानतळाचे (Navi Mumbai Airport) नाव दि. बा. पाटील विमानतळ करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

तसेच याआधी महाविकास आघाडी सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis government) हा प्रस्ताव अवैध ठरवत त्याला नव्याने मंजुरी दिली.

नामांतराचा हा ठराव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्राच्या गृहविभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता गृहविभागाने हा प्रस्ताव मंजूर केल्यास औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलले जाणार आहे.

याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करीत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीने काढला असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या