Tuesday, April 23, 2024
Homeनगरनिवासी उपजिल्हाधिकारी निचित झाले वनमंत्र्यांचे ओएसडी

निवासी उपजिल्हाधिकारी निचित झाले वनमंत्र्यांचे ओएसडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची मंत्रालयात बदली झाली असून, सोमवारी (दि.29) निचित यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

- Advertisement -

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी म्हणून निचित यांनी काम पाहिले होते. त्यानंतर नगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर देखील काही काळ त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांची बदली पुण्यात झाली होती. कोविडच्या पहिल्या लाटेपूर्वी ते पुन्हा नगरला निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदलून आले होते. कोविडच्या कालावधीत वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांनी समन्वय ठेवून काम केले होते.

विशेषतः करोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची कमतरता, औषधाची कमतरता भासत असतांना या कालावधीत सर्व विभागाशी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम निचित यांनी केले होते. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी असताना निचित यांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन दाखल्यासाठी अभिनव उपक्रम राबवला होता. गेल्या तीन वर्षापासून निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नगरमध्ये ते काम करत होते. त्यांची बदली मुंबईत मंत्रालयात झाली आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात विशेष कार्य (ओएसडी) म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून, सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या