Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारलोणखेडा-अक्कलकुवा जि.प.गटात आरक्षण बदलले

लोणखेडा-अक्कलकुवा जि.प.गटात आरक्षण बदलले

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ गटातील महिला आरक्षणाच्या सोडत आज जाहीर झाली.यात लोणखेडा व अक्कलकुवा गटात बदल झाला. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

- Advertisement -

नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी,कोपर्ली, कोळदे, रनाळे, शनिमांडळ, शहादा तालुक्यातील म्हसावद,पाडळदे बु.लोणखेडा, कहाटुळ, अक्लकुवा व खापर या ११ जिल्हा परिषदेच्या गटात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दि.४ मार्च २०२१ पासून रद्द करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते.

त्यानुसार ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. या सर्व जागा सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भरणे आवश्यक असल्याने महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

जिल्ह्यातील रिक्त ११ पैकी ५ जिल्हा परिषद सदस्यांसाठी महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आला.यात

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक विभाग आरक्षण सोडतीद्वारे निश्चित झालेले सर्वसाधारण प्रवर्ग – खापर, म्हसावद, लोणखेडा, पाडळदे बु. , खोंडामळी, कोपर्ली.

तर महिला सर्वसाधारण प्रवर्गात – कोळदे , शनिमांडळ , रनाळा, कहाटुळ, अक्कलकुव्याचा समावेश आहे. यात लोणखेडा ता.शहादा येथे या आधि महिला आरक्षण होता.तर अक्कलकुवा गटात महिला रसखी झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या