Saturday, April 27, 2024
Homeनगरआज आरक्षण सोडत

आज आरक्षण सोडत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड या 9 नगर परिषदा तर नेवाशाच्या नगर पंचायतीच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 13 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघते. कुणाला दिलासा मिळतो नी कुणाचा पत्ता कट होतो याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

कोपरगावची सोडत कोपरगाव नगरपरिषद कार्यालय, संगमनेरची रामकृष्ण सभागृह, संगमनेर नगरपरिषद कार्यालय, श्रीरामपूरची यशवंतराव चव्हाण सभागृह, श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालय, शेवगावची तहसील कार्यालय, जामखेड-तहसील कार्यालय, पाथर्डी- सभागृह, नगर परिषद कार्यालय, राहाता-सभागृह नगरपरिषद कार्यालय, राहुरी, सभागृह, नगर परिषद कार्यालय आणि नेवाशाची पंचायत समिती सभागृहात काढण्यात येणार आहे.

महिलांसाठी निम्म्या जागा असल्याने आपल्या प्रभागात महिला आरक्षण पडल्यास अनेकांनी आपल्या घरातील आई, पत्नीला उभे करण्याचे नियोजन केले आहे. तर अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षण पडल्यास शेजारच्या प्रभागात घुसखोरी करण्याची तयारी केली आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर खर्‍या अर्थाने राजकीय घडामोडींना कमालीचा वेग येणार आहे. ओबीसी वर्गासाठी आरक्षण नसल्याने या जागा खुल्या वर्गासाठी असणार आहेत.

आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या