Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedबदल्यांसाठी पुन्हा आर्जवे..; जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांच्या मुंबई फेर्‍या

बदल्यांसाठी पुन्हा आर्जवे..; जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांच्या मुंबई फेर्‍या

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Offices) अधिकार्‍यांच्या नियमित बदल्यांना कधी निवडणुकांमुळे (election) खो बसला तर कधी अचानक सरकार कोसळल्याने. आता राज्यात नवे सरकार आले आहे. आणि नवीन मंत्रिमंडळ (Cabinet) त्याचे खातेवाटप होऊन आठवडा देखील उलटला आहे.

- Advertisement -

तीन दिवसांपूर्वीच राज्यातील उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) यांचा अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती दिल्याचा शासन निर्णय आला; त्यामुळे आता लगबग लागली आहे ती बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकार्‍यांना सोयीचे ठिकाण मिळण्याची. मात्र, यात अजूनही एक अडचण आहे ती म्हणजे जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री (Guardian Minister) मिळाला नाही. त्यामुळे कोणाच्या (मर्जीने) बदल्या व्हाव्या हा प्रश्न तयार होत आहे. तरी देखील काही अधिकार्‍यांनी आपल्या मुंबई (mumbai) फेर्‍या वाढविण्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात जोर धरू लागली आहे.

यापूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयात बदल्यांच्या चर्चांना ऊत आला असून लवकरच अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या होणार आहेत. यापूर्वी बदली सोयीच्या ठिकाणी व्हावी यासाठी अनेकांनी या आधीच्या सरकारातील मंत्र्यांकडे फिल्डींग लावली होती. मात्र आता अचानक सरकारच बदलले त्यामुळे मंत्री देखील बदलत असल्याने पुन्हा नव्याने फिल्डिंग लावावी लागणार असल्याच्या चर्चा देखील जिल्हाधिकारी आवारात कर्मचारी अधिकारी यांच्यात रंगत आहेत. जिल्ह्यातील अनेक तहसीलदार (Tehsildar) आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी यंदा बदलीस पात्र आहेत.

अनेकांनी तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे. करोना (corona) काळात सरकारने अशा अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या नाहीत. परंतु, करोना संसर्गाचे नियंत्रणात आलेले आव्हान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government) होऊ घातलेल्या निवडणुका (election) या पार्श्वभूमीवर यंदा अधिकार्‍यांच्या बदल्या अटळ आहेत. जून महिन्यात बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील अनेक तहसीलदार, उपजिल्हाधिकार्‍यांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले.

सरकारी सेवेत साधारणतः एकाच ठिकाणी तीन वर्षे काम केले की अधिकारीवर्गाला बदली प्रक्रियेलां सामोरे जावे लागते. सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. ती पूर्ण व्हावी यासाठी संबंधित अधिकार्‍यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतात. मंत्रालयाचे उंबरे झिजवित तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागतात. त्यांचे मन जिंकता आले तर अपेक्षित ठिकाणी बदली मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या