Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरी रिपाइं (आठवले गट) निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार

राहुरी रिपाइं (आठवले गट) निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) देवळाली प्रवरा (Deolali Pravara) व राहुरी नगरपालिका (Rahuri Municipality) त्याचबरोबर जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समिती सर्व गट व गण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) ताकतीने लढविणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी दिली.

- Advertisement -

राहुरी (Rahuri) येथे रिपाइंच्या (आठवले गट) वतीने निवडणुकीच्या (Election) रणनितीबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रिपाइंच्या वतीने निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले. साळवे म्हणाले, घराणेशाही व साटेलोट्याच्या राजकारणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन तिसरा पर्याय निर्माण करणार आहे. मागील निवडणुकीच्या दरम्यान जनतेला दिलेल्या शब्दांचा सत्ताधार्‍यांना विसर पडलेला असून प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील कुठलेच काम स्वतः सत्ताधार्‍यांनी मार्गी लावले नाही.

राहुरी नगर परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आता नागरिकांना कळून चुकले आहे. त्यामुळे राहुरीतील जनतेच्या विकासासाठी न्यायहक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक हक्काचा पर्याय निर्माण करू इच्छित आहे. घराणेशाहीच्या वारसदारांनी जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोप करून त्यांना पर्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणुका लढविणार आहे.

रिपाइं शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जाहीरनाम्यात विविध मुद्दे घेऊन लढणार आहे. ग्रामीण रुग्णालय, स्मशानभूमी, वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी, आदिवासी भिल्ल समाज यांचे नावे भोगवटादार सदरी नोंद व घरकूल प्रश्न, शहरातील अतिक्रमण समस्या, फेरीवाले टपरीधारक यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र वाटप व पुनर्वसन करत राहात्याच्या धर्तीवर गाळे उपलब्ध, शाहूनगर कॉलेज परिसर ओढे, नाले यांचा नैसर्गिक प्रवाह खुला करुन नागरिकांचे होणारे हाल थांबविणार, निकृष्ट बंदिस्त गटार, शहरातील रस्ते मजबुतीकरण व क्राँक्रिटीकरण, भाजीमंडई, फ्रुटमंडई, मच्छीबाजार, मटण मार्केट, क्रीडासंकुल, जलतरण तलाव, गार्डन, जॉगींग पार्क, खुले नाट्यगृह व सभागृह, आदी सुविधा नागरिकांना देणार असल्याची माहिती साळवे यांनी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, उपाध्यक्ष सुनील चांदणे, सचिन साळवे, अरूण साळवे, बाबा साठे आदींसह भिमसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या