Friday, May 10, 2024
Homeनाशिकमराठी साहित्य संमेलनासाठी ३ हजार रूपये प्रतिनिधी शुल्क...वाचा सविस्तर

मराठी साहित्य संमेलनासाठी ३ हजार रूपये प्रतिनिधी शुल्क…वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनासाठी प्रतिनिधी शुल्क तीन हजार रूपये निश्चित करण्यात आले आहे. दि.२६, २७, २८ मार्च २०२१ असे तीन दिवस हे संंमेलन गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या प्रांगणात हाेणार आहे…

- Advertisement -

संमेलनासाठी उपस्थित राहणाऱ्या साहित्य रसिकांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती लाेकहितवादी मंडळाकडून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, मराठी विज्ञान कथा लेखक, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

या साहित्य नगरीला “कुसुमाग्रज साहित्य नगरी” असे नाव देण्यात आले आहे. संमेलनासाठी प्रतिनिधी शुल्क तीन हजार रूपये आकारण्यात येणार असून बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधीची निवास, अल्पाेपहार, भोजन इत्यादी व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

प्रतिनिधींनी नोंदणी [email protected] या मेल आयडीवर करावी. तसेच संमेलनाच्या खात्यावर वरील नोंदणी शुल्क जमा करावे. तरी जास्तीतजास्त कवी, लेखक, रसिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ, उपाध्यक्ष महापौर सतीश कुलकर्णी, कार्याध्यक्ष हेमंत टकले, सह कार्याध्यक्ष अॅड. विलास लोणारी, मुकुंद कुलकर्णी, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, सह कार्यवाह किरण समेळ यांनी केले आहे.

साहित्य संमेलनाच्या बँक खात्याचा तपशील

94 A B M S S LOKHITWADI MANDAL NASHIK

0770100100000005

The Nashik Merchants Co-op. Bank Ltd.

College Road Branch

IFSC : NMCB0000078

- Advertisment -

ताज्या बातम्या