‘१३ फूट लांब भवानी तलवारीची प्रतिकृती’ शिव जन्म उत्सव निमित्त छत्रपती सेनेचा उपक्रम

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | फारुक पठाण

मॉं साहेब जिजाऊ यांनी शिवरायांना महिलांच्या होणार्‍या अत्याचार व अन्याया विरुद्ध शस्त्र दिले ते शस्त्रची आजही उचलण्याची गरज वाटू लागली आहे. देशात महिलांवर होणारे अत्याचार व अमानुष छळ करून हत्या करण्यात येत आहे त्याचा निषेध म्हणून या भवानी तलवारीची प्रतिकृती छत्रपती सेनेतर्फे साकारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक चेतन शेलार यांनी दिली.

अवघ्या १ महिनेच्या अवधीवर महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्म उत्सव येऊन ठेपली आहे. या निमित्ताने छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील अनेकांनी सेनेत प्रवेश केला. मागील वर्षी २०१९ मध्ये १३ फूट उंच जिरे टोप बनवून जागतिक विक्रम करण्यात आले होते. तर यंदा शिवजन्मोत्सव निमित्याने ‘भवानी तलवारीची १३ फूट लांब प्रतिकृती’ साकारण्यात येणार आहे, या १३ फूट रुंद तलवारीची नोंद ही वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये होणार असून सदर भवानी तलवार प्रतिकृती साकारण्या साठी सुमारे १०० किलो लोखंड, मूठ पितळ साधरण ४०किलो लागणार आहे.

सध्या मूठ तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हिटलॉनची डिझाइन सुरू झाली असून नंतर फायबर मोल्ड व त्यानंतर पी.ओ.पी मोल्ड त्या नंतर मूळ पितळी मूठ साकारण्यात येणार आहे. त्याच बरोबर धातूचे पाते हे ९ इंच असेल व पुढे निमुळते होईल. १७ फेब्रुवारी २०२० रोजी या जागतिक विक्रमी भवानी तलवार प्रतिकृतीचे उदघाटन सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात होणार आह. यावेळी शिवकालीन शस्त्रची माहिती फलक येथे उपलब्ध असणार आहे. यानंतर दोन दिवस तलवारीची प्रतिकृती नाशिककरांना बघण्यास विनामूल्य खुली असेल.

तर १९ फेब्रुवारीला वाकडी बारव येथून निघणार्‍या शाही मिरवणुकीत सामील होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, तज्ञ डॉक्टर, २ परिचारिका, व रुग्णवाहिका आदी देखील ताफ्यासह मिरवणुकीत सामील होणार आहे. छत्रपती सेनेतर्फे कोणतीही वर्गणी काढली जात नाही सर्व पदाधिकारीच योगदान देतात. आज झालेल्या बैठकीत मनीष बोरस्ते यांनी प्रास्तावना केली. संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार, तुषार गवळी यांनी मार्गदर्शन केले. राजेश पवार, सागर पवार, विशाल पाटील, श्रीकांत इशे, जिल्हा अध्यक्ष शहर धीरज खोळंबे, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा पूजा खरे, जिल्हा अध्यक्षा दीपाली मेदने, महानगर प्रमुख धनश्री वाघ, असलंम लालूं, बशीद कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article