Tuesday, April 23, 2024
Homeनगर274 बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी 52 कोटींचा निधी

274 बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी 52 कोटींचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत जिल्ह्यातील 274 बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी 52 कोटींच्या निधीला जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मान्यता दिली आहे. लवकरच या कामांना सुरूवात होणार असून यापुढेही जिल्ह्यात राहिलेले बंधारे दुरुस्तीसाठी निधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

गेल्या दीड वर्षांपासून ना. गडाख हे जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या शाखांचा शुभारंभ तसेच पक्ष वाढविण्यासाठी जिल्हा दौरा करत आहेत. यावेळी अनेक ठिकाणी त्यांनी बंधारे नादुरुस्त असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. यासाठी अनेक भागात सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.तसेच जिल्ह्यातील सर्व बंधारे दुरुस्त केले जातील असे आश्वासन ना.गडाख यांनी दिले होते. त्यानुसारच बंधारे दुरुस्तीसाठी हा निधी मंजूर झाला आहे.

यात कर्जत तालुक्यातील 31 बंधार्‍यासाठी 6 कोटी 12 लाख, कोपरगाव 15 बंधारे 14 कोटी, जामखेड 40 बंधारे 6 कोटी, नगर तालूक्यातील 10 बंधारे 3 कोटी, पारनेर 127 बंधारे 24 कोटी 53 लाख, राहाता 17 बंधारे 2 कोटी 21 लाख, राहुरी 9 बंधारे 1 कोटी, श्रीगोंदा 25 बंधारे 7 कोटी 32लाख, अकोले 13 बंधारे 2 कोटी 58 लाख, नेवासा 10 बंधारे 2 कोटी 13 लाख, तसेच संगमनेरसाठी यापूर्वी 4 कोटीचा निधी जलसंधारण खात्याने दिला आहे. पुढील टप्प्यात पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूरसह अन्य ठिकाणचे बंधारे दुरुस्त केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनांच्या मूळ आराखड्यात नगर जिल्ह्यातील 469 योजना समाविष्ट असून या योजनांमुळे 13 हजार 228 हेक्टर सिंचन क्षेत्र व 58422.25 घन मीटर पाणी साठा पुनर्स्थापित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे हजारो शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 386 योजनांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या