Friday, April 26, 2024
Homeनाशिकमोहाडी परिसरातील रस्त्यांचे नुतनीकरण

मोहाडी परिसरातील रस्त्यांचे नुतनीकरण

जानोरी | वार्ताहर | Janori

मोहाडी परिसरातील सर्वच प्रमुख रस्ते मंजूर झाले आहे. दिवाळीनंतर या रस्त्यांची कामे सुरू होतील, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले…

- Advertisement -

मोहाडी ते विमानतळ रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोहाडी-साकोरा, मोहाडी-दिंडोरी, मोहाडी-पालखेड आदींसह पूर्व भागातील सर्व प्रमुख रस्त्यांना आपण मंजूरी मिळवली आहे.

पावसाळा संपताच दिवाळीनंतर आपण या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर शेतकरी कर्जपुरवठा सुरळीत होणे, जिल्हा बँक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरु असल्याबाबतही झिरवाळ यांनी नमूद केले.

आयटीआयच्या शिक्षकांच्या मागण्यांबाबत आपण शासनाला लक्षात आणून देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी आशा सेविकांनी विविध मागण्यांसाठी झिरवाळ यांनी निवेदन दिले.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत आशा वर्कर्सच्या मानधनाबाबत आपण शासनस्तरावर नक्कीच प्रयत्न करणार आहोत तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आशा वर्कर्सला काही मदत करता आली तर तसा प्रस्तावही शासनासमोर मांडण्यात येईल असे आश्वासन दिले.

अण्णाभाऊ साठे समाजिक सभागृहाचे भुमीपूजन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, शाम हिरे, शंकरराव काठे, शहाजी सोमवंशी, सुरेश कळमकर, तुकाराम जोधंळे, शंकरराव वाघ, जानोरीच्या सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, मविप्रचे शिक्षणाधिकारी नानासाहेब पाटील, पंढरीनाथ ढोकरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण देशमुख यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या