Friday, April 26, 2024
Homeनाशिकदुर्गम भागातील गावे टँकरमुक्त

दुर्गम भागातील गावे टँकरमुक्त

हरसूल । वार्ताहर | Harsul

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) हिवाळी या गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची सोय (Water supply in summer) करून देत सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने (Social Networking Forum Organization) टँकरमुक्तीच्या (Tanker free) दिशेने रौप्य महोत्सवी पाऊल टाकले आहे.

- Advertisement -

स्ट्रल फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यातून मागील वर्षी हाती घेतलेल्या या गावाचे काम अलीकडेच पूर्ण झाले. ऐन उन्हाळ्यात जल योजनेचे लोकार्पण (Dedication of water scheme) संपन्न झाले. याप्रसंगी बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे, स्ट्रल फाउंडेशनचे अनिकेत धुरी, एसएनएफचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गाव केशव गावित या तरुण शिक्षकाने (teacher) साकारलेल्या आदर्श शाळेच्या (school) निमित्ताने अनेकांपर्यंत पोहोचवले. पण पाण्याच्या टँकरच्या (water tanker) यादीत ते त्यापूर्वीच पोहोचलेले होते.

अलीकडे गावापर्यंत बाहेरचे जग थोडे फार पोहोचले असले तरी आतापर्यंत पोहोचले नव्हते ते पाणी! पण आता हे गाव दुष्काळग्रस्त गावांच्या लांबलचक यादीतून गायब झालं आहे. कारण हेही गाव टँकरमुक्त करून एसएनएफने तिथं कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना (Water supply scheme) सुरु केली आहे. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या माध्यमातून असे या यादीतील अदृश्य होणारं हे 25 वं गाव आहे. यावेळी गावात पाणी आल्याच्या आनंदात गावकर्‍यांनी भरलेल्या पाण्याच्या हंड्यांसकट आलेल्या सर्व पाहुण्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली.

संपूर्ण गाव दिवाळीपेक्षाही जास्त आनंद उत्साहात रांगोळ्यांनी सजले होते. सर्व घरांवर फुलांच्या माळा लावल्या होत्या. महिला मुलांसह ग्रामस्थांनी नाचत गाजत आणि मान्यवरांनाही नाचवत पाण्याचे स्वागत केले हा प्रसंग शब्दातीत होता. यावेळी पद्मश्री राहीबाई पोपरे, ऍस्ट्रॉल फाउंडेशनचे समन्वयक अनिकेत धुरी, सोशल नेटवर्कींग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, विजय दुबे, नंदिनी दुबे, प्रशासक सुनिल विटनोर, देवराम मौळे, प्रकाश मौळे, प्रकाश भिवसन, बाळू पवार, भगवान मौळे,

गोवर्धन गायकवाड, राजेंद्र भरसट, लहु जाधव, यशपाल मोरे, प्रशांत बच्छाव, आनंदा बावले, डॉ. उत्तम फरताळे, सुनिल पाटील, ग्रामसेवक शक्ती सोनवणे, तालुका समन्वयक संदिप बत्तासे, विजय भरसट, डॉ. निलेश पाटील, रामदास शिंदे, संदिप डगळे आदींसह ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन रामदास शिंदे यांनी केले तर आभार संदिप बत्तासे यांनी मानले.

सोशल नेटवर्किंग फोरमच्या जलाभियानाचे रौप्यमहोत्सवी 25 वे हिवाळी गाव टँकरमुक्त होतांना एसएनएफ टीमला समाधान आहे. ग्रामपंचायत सहकार्य व दात्याच्या मदतीने अजूनही अनेक गावांचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही सदैव झटत राहू.

– प्रमोद गायकवाड अध्यक्ष एसएनएफ

- Advertisment -

ताज्या बातम्या