Thursday, April 25, 2024
Homeनगररेमडिसीवीरच्या मागणी पुढे जिल्हाधिकारी हतबल

रेमडिसीवीरच्या मागणी पुढे जिल्हाधिकारी हतबल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना काळात फ्रंन्ट लाईन वर्कर म्हणून काम करणार्‍या मनपाच्या दोन कर्मचार्‍यांना करोना संसर्ग झाला.

- Advertisement -

हे दोन्ही कर्मचारी रूग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असून ते मिळविण्यासाठी महापालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे यांना संपर्क केला. परंतू, जिल्ह्यात रेमडेसिवीर कमी आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. यामुळे लोखंडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.

करोनाकाळात अत्यावश्यक सेवा देण्याचे काम मनपाच्या कर्मचार्‍यांवर आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, सफाई यासाठी मनपाचे शेकडो कर्मचारी काम करतात. आतापर्यंत 150 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. यात 11 कर्मचार्‍यांचा जीव गेला आहे. मनपाच्या रूग्णालयात काम करणारी एक नर्स व पाणीपुरवठा विभागाचा एक कर्मचारी यांना काम करताना करोनाची बाधा झाली.

त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही कर्मचारी सध्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती खालवली असल्याने त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. ते मिळविण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून नातेवाईकांसह कर्मचारी युनियनचे अध्यक्ष लोखंडे यांचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, आयुक्त गोरे यांच्याशी संपर्क साधला परंतू रात्री उशिरापर्यंत रेमडेसिवीर उपलब्ध झाले नसल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या