Friday, April 26, 2024
Homeनाशिकप्राधिकृत वितरककडूनच मिळणार रेमडिसिव्हर : पालकमंत्री भुजबळ; पाॅझिटिव्हचा आलेख खालावला

प्राधिकृत वितरककडूनच मिळणार रेमडिसिव्हर : पालकमंत्री भुजबळ; पाॅझिटिव्हचा आलेख खालावला

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

मागील दोन दिवसात जिल्ह्याला आठ हजार रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळाले असले तरी मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र प्रत्येक करोना रुग्णाला इंजेक्शनची आवश्यकता नाही. रेमडिसिव्हरचा तुटवडा असल्याचे मान्य करावे लागेल.

- Advertisement -

यापुढे मेडिकलमधून रेमडिसिव्हर मिळणार नाही. महापालिका, जिल्हा रुग्णालय यांच्याकडे रेमडिसिव्हर इंजेक्शनचा साठा दिला जाईल.

ज्या रुग्णालयांना इंजेक्शन हवे असेल त्यांनी शासकीय रुग्णालयांकडून ते प्राप्त करुन घ्यावे जेणेकरुन रेमडिसिव्हरचा तुटवडा व काळाबाजार होणार नाही, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १०) करोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रेमडिसिव्हीर प्रत्येक रुग्णाला आवश्यक नाही. डॉक्टरांनी याचं गांभीर्य लक्षात घ्यावे. जिल्ह्यात व्हेंटिलेटर सध्या पुरेसे आहे.

आवश्यकता असेल तर अजून मागवणार. ‘ब्रेक द चेन’ मुळे फायदा झाला. पॉझिटिव्हीटीचा आलेख ३० टक्क्यांनी कमी झाला.ग्रामीण भाग आणि मालेगावात १२ ते १९ टक्के आलेख खालावला. करोना संकट हा सगळ्यांचा एकत्रीत लढा आहे.

खाजगी हॉस्पिटल्सनी ऑक्सिजन वापरावर नियंत्रण ठेवावे आणी साठा वाढवावा. गरज नसतांना, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागात ३१ ठिकाणी नवीन कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

ऑक्सिजन तुटवडा आहे. ड्युरा सिलेंडर मिळवायचे प्रयत्न आहे. १५८ मेट्रिक टन पैकी ९६ मेट्रिक टन पुरवठा आपल्याकडे शिल्लक आहे. सिन्नरच्या दोन कंपन्या आपण ताब्यात घेऊन उत्पादन करतोय असे त्यांनी सांगितले.

– रुग्णांनी अ‍ावश्यकत‍ा नसताना बेड अडवू नये

– प्रत्येकाला रेमडिसिव्हर इंजेक्शन गरजेचे नाही

– ‘आयएमए’ संघटनेने मदतीसाठी पुढाकार घ्यावा

– खासगी डाॅक्टरांनी कोव्हिड सेंटरमध्ये सेवा द्यावी

– मुंबईच्या धर्तीवर बेडच्या उपलब्धतेबाबत अॅपवर माहिती द्यावी

– लाॅकडाउन नियमावलीबाबत स्थानिक प्रशासनातील गोंधळ वरपर्यंत पोहचवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या