Friday, April 26, 2024
Homeनगररेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

सोनई |वार्ताहर| Sonai

नगरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून वडाळाबहिरोबा येथे रेमडेसिवीरचा काळाबाजार प्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींस काल सोमवारी नेवासा न्यायालयापुढे उभे केले असता सर्वांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisement -

खबर्‍यामार्फत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रविवारी गुन्हे अन्वेषण पथकाने वडाळाबहिरोबा येथील हॉटेल समाधान समोर छापा टाकून विनापरवाना प्रकरणी रामहरी बाळासाहेब घोडेचोर, आनंद पुंजाराम थोटे, पंकज गोरक्षनाथ खरड, सागर तुकाराम हंडे या चार आरोपीस अटक करुन 11 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. सोमवारी या चौघा आरोपींस नेवासा न्यायालयापुढे उभे केले असता 13 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली.

या प्रकरणाचा तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बागुल यांच्याकडे असून येथील पथकाने दिवसभर वडाळा येथील एका पसार आरोपीचा शोध घेतला. मात्र सायंकाळपर्यंत कुठलाही धागादोरा हाती लागला नाही. या प्रकरणातील दोन आरोपी नेवासा तालुक्यातील असून तपासात अजून किती आरोपी पुढे येतात याविषयी ग्रामस्थांत चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या