Wednesday, April 24, 2024
Homeजळगावशिवाजीनगर उड्डाणपुलासाठी अडथळा ठरणारे विद्युुत पोलचे स्थलांतर

शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी अडथळा ठरणारे विद्युुत पोलचे स्थलांतर

जळगाव (Jalgaon) प्रतिनिधी

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे नवीन बांधकाम करण्यात येत आहे. मात्र अडथळा ठरणार्‍या विद्युतपोलमुळे काम रखडलेले होते. दरम्यान, महानगरपालिकेने महावितरणकडे १ कोटी ४९ लाखाचा निधी वर्ग करताच बुधवारपासून ट्रान्सफार्मर (Transformer) आणि पोल (Poll) काढण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

शिवाजीनगरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम केवळ अडथळे ठरणार्‍या पोलमुळे रखडले होते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मंजूर केलेल्या २५ कोटीच्या उर्वरीत निधीतून १ कोटी ४९ लाखाचा निधी मनपा प्रशासनाने महावितरणकडे वर्ग केला आहे. त्यामुळे बुधवारपासून पोल काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पाच ट्रान्सफार्मर राहणार

शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी अडथळा ठरणार्‍या ट्रान्सफार्मर आणि पोल काढण्यात येणार आहे. त्याऐवजी आता भूमीगत केबल टाकण्यात येणार आहे. उड्डाणपुलापासून ते शिवाजीनगर दूध फेडरेशनरोड, साळुंखे चौक आणि टॉवर चौकापर्यंत भूूमीगत केबल टाकण्यात येणार आहे. तसेच शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात चार ट्रान्सफार्मर तर शहर पोलीस ठाण्यासमोर एक ट्रान्सफार्मर उभारण्यात येणार आहे.

फिडर पिलरवरुन होणार वीजपुरवठा

विद्युत पोल काढल्यानंतर भूमीगत केबल टाकली जाणार आहे. त्यानुसार उड्डाणपुलापासून ते शिवाजीनगर दूध फेडरेशनरोड, साळुंखे चौक आणि टॉवर चौकापर्यंत सोळा ठिकाणी फिडर पिलर कार्यान्वयीत करण्यात येणार असून वीजग्राहकांना त्याठिकणाहून वीजपुरवठा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती महानगरपालिका विद्युत विभागाचे प्रमुख एस. एस. पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या