Saturday, April 27, 2024
Homeनगरधार्मिक विधिसाठी इंदोरीकर महाराज पुणतांब्यात गोदावरीतिरी

धार्मिक विधिसाठी इंदोरीकर महाराज पुणतांब्यात गोदावरीतिरी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

संपूर्ण महाराष्ट्रात किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर

- Advertisement -

यांनी काल 11 वाजता श्रीक्षेत्र पुणतांबा येथे सहपरिवार येऊन गोदावरी नदीकाठी धार्मिक विधी पूर्ण केला.

काल अधिक मास अमावस्येचा पूर्व काळ होता. या काळात विशिष्ट धार्मिक विधी पूर्ण करून पुण्यप्राप्ती केली जाते. त्यामुळे काल सकाळपासूनच श्रीक्षेत्र पुणतांबा येथे भाविकांची ये-जा सुरू होती. भाविकांनी पवित्र गोदावरी नदीत गंगास्नान करून योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीचे बाहेरूनच दर्शन घेतले.

काल 11 वाजेच्या दरम्यान इंदोरीकर महाराज यांचे चांगदेव महाराज मंदिर परिसरात आगमन झाले. त्यांचा खासगी दौरा असल्यामुळे त्याची फारशी वाच्यता नव्हती. आल्यानंतर त्यांनी थेट गोदावरी नदीपात्रात जाऊन गंगास्नान केले. गंगास्नान होईपर्यंत महाराज आले आहेत हे कुणाच्याही लक्षात आले नाही.

गंगास्नान झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत त्यांनी घाटावर धार्मिक विधी पूर्ण केला. इंदोरीकर महाराज आलेले आहेत याची पुसटशी कल्पना योगीराज चांगदेव महाराज देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण यांना आली. त्यांनी तातडीने महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे यथोचित आदरतिथ्य केले. त्यानंतर निवृत्ती महाराज यांनी मुक्ताई ज्ञानपीठात जाऊन महंत रामानंदागिरी महाराज यांचीही औपचारिक भेट घेऊन ते तातडीने संगमनेरकडे मार्गस्थ झाले.

दरम्यान इंदोरीकर महाराज चांगदेव महाराज मंदिर परिसरात आले आहेत हे वृत्त वार्‍यासारखे पुणतांबा गावात पसरले व त्यांच्या भक्तगणांनी मंदिराकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत महाराज निघून गेले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या