Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारनवापूर शहरात शनिवार, रविवारी धार्मीक स्थळे बंद

नवापूर शहरात शनिवार, रविवारी धार्मीक स्थळे बंद

नवापुर | श.प्र. nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत आहे.त्यामुळे मागील वर्षा पेक्षा या वर्षी त्यांची संख्या दुप्पट झाली आहे.यामुळे नंदुरबार जिल्हात कोविड-१९ मुळे काही निर्बध जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी लावले असुन नवापूर शहरात शनिवार ते रविवार संपुर्ण मंदीर,मशिद,चर्च बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

- Advertisement -

यामुळे शुक्रवारी सर्व मंदीर,मशिदीचे ट्रस्टी यांची बैठक नवापूर पोलिस स्टेशन येथे तहसिलदार मंदार कुलकर्णी व पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी घेतली.

सदर बैठकीत मंदीर ,मशिद ट्रस्टी यांना आठवड्याचा प्रत्येक शनिवार व रविवार सर्व प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच जिम,फेटनेस क्लब,व्यायाम शाळा यांना पुढील आदेशा पर्यंत बंद ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्या.

नवापूर शहरात दि ११ मार्च २०२१ पासुन संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजे पर्यंत संपुर्ण नवापूर शहरात सी .आर. पी. सी.१४४ कलम लागु करण्यात आलेला असुन संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे.तरी नवापूर शहरातील सर्व दुकाने सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंतच सुरु राहातील तसेच दि.१८ मार्च २०२१ पासुन लॉन्स,मंगल कार्यालय,हॉल या ठिकाणी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम पुढील आदेश पर्यंत बंद करण्यात आले आहे.

रात्री ७ वाजता शहरात तहसिलदार मंदार कुलकर्णी व पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी संपुर्ण शहरात फेर फटाका मारतांना दिसत असुन शहरात स्वताहुन दुकानदार आपले दुकाने बंद करुन नियमाचे पालन करतांना दिसत आहे.तसेच संपुर्ण नवापूर शहरात विना मास्क फिरणार्‍यांवर पोलिस दलातर्फे दंडात्मक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या