Friday, April 26, 2024
Homeनगरधार्मिक समारंभातून 48 जणांना मिळाला करोनाचा ‘प्रसाद’

धार्मिक समारंभातून 48 जणांना मिळाला करोनाचा ‘प्रसाद’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा आलेख खाली येत असतांना नगर तालुक्यातील अकोळनेर गावात मात्र, अचानक करोनाचा उद्रेक झाला आहे.

- Advertisement -

या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी गावातील नागरिक एकत्र आले होते. त्यानंतर गावातील अनेकजणांना अस्वस्थ वाटल्याने आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत तीन दिवसांत करोनाचे नव्याने 48 रुग्ण समोर आले आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर गाव लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.

नगर तालुक्यात अकोळनेर हे गाव आहे. साधारण 6 ते 6 हजार 500 लोकवस्तीच्या गावात नुकतीच एका ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानिमित्त गावकरी एकत्र आले होते. त्याठिकाणी भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर कोजागीरी पोर्णिमेनिमित्त दूध वाटपचा कार्यक्रम झाला. यावेळी करोना बाधित व्यक्ती या ठिकाणी हजर असल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे.

कार्यक्रमानंतर करोनाची लक्षणे असणार्‍या रुग्णांची ओरड झाली आणि नगर तालुका आरोग्य विभागासह पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांनी गावात धाव घेत तातडीने करोना चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवारपासून या ठिकाणी करोना चाचणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी 5 करोना बाधीत त्यांनतर शनिवारी 39 आणि रविवारी 54 करोनाचे असे एकूण 48 करोना रुग्ण गावात सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी गावाला भेट दिली आहे.

या ठिकाणी माजी सभापती भोर, तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती मांडगे, वैद्यकीय अधिकारी रेश्मा पवार, सर्कल पवार, तलाठी कोळपकर हे तीन दिवसांपासून गावात ठाण मांडून असून लक्षणे असणार्‍या नागरिकांची करोना चाचणी करण्यात येत आहे. गावात मोठ्या संख्याने करोना रुग्ण सोपडल्याने येत्या गुरुवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

गुरूवारपर्यंत परिस्थिती सुधारण झाल्यास लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात येणार आहे. गावात रुग्ण वाढत राहिल्यास या ठिकाणी 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती माती सभापती भोर यांनी दिली.

तलाठी-ग्रामविकास अधिकार्‍यांचे काम चांगले

गावात अचानक करोनाचा संसर्ग वाढल्याने गावातील तलाठी पवार आणि ग्रामसेवक कोळपकर यांनी गावात करोना संसर्गाविरोधात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. यासह प्रत्येक कुटूंबापर्यंत हे दोघे पोहचून कुटूंबातील आजारी असणार्‍या व्यक्तींची माहिती घेत आहेत. कोणत्याही परिस्थिती गावात करोना वाढणार नाही, याची दक्षता हे दोघे घेतांना दिसत असून दोघांचे काम चांगले असल्याचे सभापती भोर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या