Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशReliance मध्ये नेतृत्वबदलाचे संकेत, कोण होणार मुकेश अंबानींचा उत्तराधिकारी?

Reliance मध्ये नेतृत्वबदलाचे संकेत, कोण होणार मुकेश अंबानींचा उत्तराधिकारी?

मुंबई | Mumbai

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये (Reliance Group) आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत.

- Advertisement -

नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या…

धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कंपनीच्या फॅमिली डे (Reliance Family Day) कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची भाषा केली आणि आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. सक्षम केले पाहिजे. प्रोत्साहन दिले पाहिले. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त यश मिळवल्यामुळे शांत बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत, असा स्पष्ट उल्लेख केला. त्यामुळे आता रिलायन्सचा उत्तराधिकारी म्हणून पुढे कोण येणार, याची उद्योग जगतात चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना अंबानी म्हणाले की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited (RIL)) ही येत्या काही वर्षांत जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि मजबूत कंपन्यांपैकी एक असेल. यामध्ये स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्राव्यतिरिक्त किरकोळ आणि दूरसंचार व्यवसाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. तसेच, मोठी लक्ष्य आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य माणसं आणि योग्य नेतृत्न असणं आवश्यक आहे. रिलायन्स समुहातील नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेला आम्ही वेग हेत आहोत. माझ्या पिढीतील सहकाऱ्यांच्या हातातून नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याची ही प्रक्रिया असणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

दरम्यान इशा अंबानी (Isha Ambani) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) हे सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिजीटल विंगच्या संचालक मंडळावर आहेत. तर अनंत अंबानी हा रिलायन्स न्यू सोलर एनर्जीचा संचालक आहे. मात्र, अजून हे तिघेही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या मुख्य कंपनीच्या संचालक मंडळावर नाहीत.

सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

- Advertisment -

ताज्या बातम्या