Thursday, April 25, 2024
Homeधुळेअमरावती, वाडी शेवाडी आणि अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडा

अमरावती, वाडी शेवाडी आणि अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडा

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने शिंदखेडा तालुक्यातील अमरावती प्रकल्पातुन विखरण पाटचारीत तसेच वाडी शेवाडी तुन बुराई नदी पात्रात तर अक्कलपाडा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित पाणी सोडावे अशी मागणी आ. जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकार्‍याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

शिंदखेडा तालुक्यातील सुराय, खर्दे, मांडळ, विखरण, कामपुर, मेथी यासह अन्य गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अमरावती प्रकल्पातील पाणी विखरण पाटचारीत सोडण्यात यावे अशी मागणी आ. रावल यांनी केली आहे.

तर वाडी शेवाडी प्रकल्पात देखील पाण्याचा साठा उपलब्ध असून याबाबत गेल्या 8 दिवसापासून पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

परंतु अद्याप पाणी सोडलेले नाही बुराई नदी च्या काठावरील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

पांझरा नदीकाठावर असलेल्या शिंदखेडा , अमळनेर व धुळे तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पांझरा नदीतून अथवा काठावर स्त्रोतातून आहे व सद्यःस्थितीत उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे.

शिंदखेडा मतदारसंघातील कंचनपुर, वालखेडा अजंदेबु, बेटावद, पढावद, भिलाणे, मुडावद या गावातून मागणी केली असुन त्यांना तात्काळ पाणी सोडून भर उन्हाळ्यात दिलासा द्यावा अशी मागणी आ. रावल यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या