Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीरामपुरात पोलिसांकडून पाच गोवंश जनावरांची सुटका

श्रीरामपुरात पोलिसांकडून पाच गोवंश जनावरांची सुटका

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये पोलिसांनी काल पाच गोवंश जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून पोलिसांनी वॉर्ड नं. 2 मधील गौसिया मस्जिद परिसरातील देवीच्या मंदिरामागे छापा टाकला असता तेथे पत्र्याच्या शेडमध्ये चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीनेे आखूड दोरखंडाने बांधलेल्या जीवंत गोवंश जातीच्या दोन काळ्या-पांढर्‍या गायी तसेच एक पांढर्‍या रंगाची गाय, एक गोवंश जातीची तांबड्या रंगाची कालवड अशी पाच गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यांची किंमत अंदाजे 35 हजार रुपये इतकी आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन जगन्नाथ शिरसाठ यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी रिजवान ईस्माइल कुरेशी (रा. गौसिया मस्जिद परिसर, वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याच्याविरूद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 195 चे सुधारित कायदा 2015 चे कलम 5, 5 (ब), 9 सह प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (च) (ज) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. आडांगळे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या